Posts

Showing posts from October, 2018

#अरण्य, ठिपके आणि मी

अनपेक्षित....अकल्पित.... 2 दिवस शाळेत 'अरण्यगाथा' कार्यक्रम झाला. वन्य जीवनावर आधारित फिल्म्स पहिल्या. वाघांवरचे माहितीपट विशेष आवडले. त्या कार्यक्रमाच्या समारोपानंतर लगेचच चिपळूणसाठी निघालो. मुलांचे शिबीर घेऊन जायचे आहे, त्याची पूर्वतयारी......... परतीचा प्रवास सुरु होता. नाही म्हंटल तरी कंटाळा आला होता. कुंभार्ली घाटातून गाडी चालली होती. साधारण 6.30 चा सुमार. गाडीचा हायवेवरचा वेग ताशी 120 तर घाटातला 70-80 किमी. त्याखाली गाडी चालवणं म्हणजे आमच्या नानांसाठी जणू पापच. घाटाच्या भिंतीचे कठडे जागोजागी तुटलेले. सहज नजर गेली. काही तरी पाहिल्यासारखं झालं. छे कसं शक्य आहे. भास असावा, वेगळं काही असेल...मन समजूत काढत होतं. गाडी थोडी पुढे गेली. माझी नजर मागेच होती. 'त्याची' मान वळताना पाहिली. अरे....अरे हा खरंच बिबट्या आहे. नाना, नाना वाघ ......गाडी थांबवा... वळवा, गाडी वळवा....नुसता आरडाओरडा. मी नानांच्या अंगावर जाऊन पडण्याचं केवळ बाकी होतं. ते ही क्षणभर याला काय झालं म्हणून दचकले, पण लगेच सावरले. घाट आहे, समोरून गाडी येतीये की ...