#अरण्य, ठिपके आणि मी

अनपेक्षित....अकल्पित....
2 दिवस शाळेत 'अरण्यगाथा' कार्यक्रम झाला.
वन्य जीवनावर आधारित फिल्म्स पहिल्या.
वाघांवरचे माहितीपट विशेष आवडले.
त्या कार्यक्रमाच्या समारोपानंतर लगेचच चिपळूणसाठी निघालो.
मुलांचे शिबीर घेऊन जायचे आहे, त्याची पूर्वतयारी.........


परतीचा प्रवास सुरु होता.
नाही म्हंटल तरी कंटाळा आला होता.
कुंभार्ली घाटातून गाडी चालली होती.
साधारण 6.30 चा सुमार.
गाडीचा हायवेवरचा वेग ताशी 120 तर घाटातला 70-80 किमी. त्याखाली गाडी चालवणं म्हणजे आमच्या नानांसाठी जणू पापच.
घाटाच्या भिंतीचे कठडे जागोजागी तुटलेले.
सहज नजर गेली.
काही तरी पाहिल्यासारखं झालं.
छे कसं शक्य आहे.
भास असावा, वेगळं काही असेल...मन समजूत काढत होतं.
गाडी थोडी पुढे गेली.
माझी नजर मागेच होती.
'त्याची' मान वळताना पाहिली.
अरे....अरे हा खरंच बिबट्या आहे.
नाना, नाना वाघ ......गाडी थांबवा... वळवा, गाडी वळवा....नुसता आरडाओरडा.
मी नानांच्या अंगावर जाऊन पडण्याचं केवळ बाकी होतं.
ते ही क्षणभर याला काय झालं म्हणून दचकले, पण लगेच सावरले.
घाट आहे, समोरून गाडी येतीये की नाही कशाचाच विचार नाही...
गाडी गर्रकन वळली.
आम्हाला तरी कुठे फिकीर होती.
त्याला पाहायचं होतं, दुसरं काही नव्हतंच मनात.
आता गाडी एकदम हळू.
कासवाच्या गतीनं.
तुटलेल्या कठड्याच्या 2,3 जागा गेल्या.
नाही दिसला.
गेला असेल बहुधा की मला खरंच भास झाला...मन अस्वस्थ.
गाडी अजून थोडी पुढे गेली.
आणि आणि तो दिसला...
त्या तुटक्या जागेतून त्याचा फक्त चेहराच दिसत होता.
त्याच्या पासून मोजून...मोजून 5 फुटांवर गाडी होती.
गाडीच्या काचा खाली होत्या.
नजरेला नजर होती.
प्रत्येक क्षणाचं मोल समजलं, त्या 20-25 सेकंदात.
देहभान हरपनं, समाधी लागनं वगैरे वाक्प्रचारांचा अर्थ  उलगडला त्या अर्ध्या मिनिटात.
तो किती मोठा आहे हे मात्र समजत नव्हतं.
फोटो काढण्याचीही शुद्ध नव्हती.
काही सेकंदानी भानावर आलो.
खांडेकर साहेबांनी मोबाईल काढला.
फोटो काढला, फ्लॅश पडला...
फ्लॅशने बिबटेबुवा अस्वस्थ.
आणि लगेच मागे वळून पसार.
आम्ही मात्र हवेतच.
जे पाहिलं त्यावर विश्वासच बसत नव्हता.
थोडं पुढे जाऊन गाडीने परत यु टर्न घेतला.
एका वेगळ्याच आनंदात आम्ही सगळे.
आणि......
तो...तो परत समोरून गेला.
आख्खा....
एकदम वेगात.
आता मात्र त्याचं पूर्ण दर्शन झालं.
फारच देखणा, रुबाबदार प्रौढ होता तो.
त्याच्या संपूर्ण दर्शनाने आम्ही सातवे आसमान पर...
झाडीत जाऊन परत थांबला.
मागे वळून आमचा कानोसा घेतला आणि पसार झाला.

गाडीत माणसं तीनच होती.
पण दहा माणसांचा गलका सुरू होता.

अभयारण्यात वाघ दिसणार असं मनात असताना त्याच दिसण वेगळं आणि ध्यामीमनी नसताना त्याच 'दर्शन' होणं वेगळंच.

2 दिवस मुलांना माझ्या फिल्म दाखवल्यास ना म्हणून तुला दर्शन दिलं.... माझं स्वगत

आईशप्पथ जिम कार्बेट ला जाऊन दिसला नाही आणि इथं....इथं दिसला....नानांच स्वगत


दादा काय नजर आहे तुझी, मानलं तुला...खांडेकरांची बडबड चालू होती.


परवा जाताना याच घाटात मुंगूस आडवं गेलं होतं. खांडेकर म्हणाले, दादा मुंगूस दिसणं शुभ असत बरं. 
काहीही बोलू नका हो खांडेकरसाहेब 
....आता मात्र 'तो' दिसण्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे.

आता फोटोची उत्सुकता.
फोटोत नुसतं काळ काळ.
खांडेकर साहेबांनी त्यांच्या बाजूची काच खाली घेतलीच नव्हती.
फ्लॅश रिफ्लेक्ट झाला होता.
केवळ शिव्यांची लाखोली.

पण तरी मन शांतच होतं.
आणि शरीरभर समाधान होतं.

शिवराज

Comments

  1. वा अप्रतिम
    खुप छान लिखाण दादा.

    ReplyDelete
  2. प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला इतकं मस्त वर्णन केलंय !!!👍

    ReplyDelete
  3. मस्त, अभिनंदन दाद

    ReplyDelete
  4. छान माहिती आहे दादा.

    ReplyDelete
  5. छान माहिती मिळाली दादा

    ReplyDelete
  6. फारच मस्त... स्वगत mst... मौन संवाद आठवले.....

    ReplyDelete
  7. फारच मस्त... स्वगत mst... मौन संवाद आठवले.....

    ReplyDelete
  8. लिहीते रहा ! छान सुरवात.

    ReplyDelete
  9. शिवराज छानच लिहिलं आहे.

    ReplyDelete
  10. Chan lihile ahe. Bibatyacha photo asata tar ajun chan watale asate.

    ReplyDelete
  11. अप्रतिम अनुभव👍👍👍

    ReplyDelete
  12. छान वर्णन केले आहे.

    ReplyDelete
  13. Wah , sagle chitra dolya samor ghadtye asa bhaas zala.

    ReplyDelete
  14. खुप छान वर्णन शिवराज दादा प्रसंग प्रत्यक्ष घडल्यासारखे वाटले 👍👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog