#जेव्हा वीरगती जिवंत होते...
अभ्यास सहल क्र. १ जेव्हा वीरगती जिवंत होते... ...अनिल दुधानी सरांनी मुलांना एका वीरगळी पाशी नेलं आणि ते सांगू लागले... ‘’मुलांनो ही वीरगळ पहा. याच्या सर्वात खालच्या कप्प्यात वीरगती प्राप्त झालेला वीर दिसतोय. हा वीर पायदळातील होता. त्याने दोन घोडेस्वारांशी पराक्रमाने झुंज दिली. शत्रू घोडेस्वारांच्या हातात भाले होते. वीराच्या हातातही भा ला होता. वीर पराक्रमाने लढला. पण त्याचा शत्रू सैन्यासमोर निभाव लागला नाही. त्याची झुंज अपयशी ठरली. त्याला वीरगती प्राप्त झाली. पण या वीराची अवस्था नाही चिरा नाही पण ती अशी झाली नाही. त्याच्या अतुलनीय शौर्याची गाथा वीरगळी वर कोरली गेली. राज्यासाठी लढण्याचं-मरण्याचं पुण्य त्याला मिळालं. त्याला न्यायला स्वर्गातून चार अप्सरा आल्या. त्यांच्या हातात चौरी होती. चौरीने वीराला हवा घालत अप्सरा त्याला घेऊन स्वर्गात गेल्या. वरच्या खणा...