Posts

Showing posts from March, 2019

#..असे प्रबोधन हे आजीवन तुज सम आम्हा जमो...

Image
..असे प्रबोधन हे आजीवन तुज सम आम्हा जमो... २०१५ पासून पोंक्षे सर निगडीत यायला लागले. मग मा. संचालकांप्रमाणे त्यांचेही नियोजन मी करायला लागलो. आज सहज ती वही चाळत होतो. खूप विषय हाताळले आहेत सरांनी निगडीत. अनेकांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या आहेत. अनेकांचे पाठ पाहिले आहेत. त्यावर लेखी, तोंडी प्रतिसाद दिला आहे. मग एकदा अशीही चर्चा झाल्याची आठवतीये की पाठ पाहून प्रतिसाद देण्यापेक्षा पाठटाचणावर चर्चा करू, म्हणजे त्याचा उपयोग लगेचच अध्यापकांना पाठ घेताना होईल. मग त्या पद्धतीने नियोजनात बदलही करण्यात आला. अभिव्यक्ती योजना, सहाध्याय दिन, प्रकल्प पद्धती, स्नेहसंमेलन, कार्यपत्रके अशा अनेक विषयांवर निगडीतील अनेक सदस्यांना  सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष या नात्यानं त्यांनी शैक्षणिक, कायदेशीर, शासकीय अशा अनेक गोष्टींवर विभाग प्रमुखांशी संवाद साधला आहे. पालक बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर बोलले आहेत. एकदा ७ वीच्या मुलांसाठी नाण्यांंतून समजणारा इतिहास या विषयावर एक कार्यशाळा घेतल्याचेही आठवत आहे... निगडीत आल्यावर बऱ...