#...विहंगमांचे भव्य थवे...
...विहंगमांचे भव्य थवे... दीड तास झाला तरी मुले व्याख्यान ऐकण्यात दंग होती. व्याख्याते होते श्री. उमेश वाघेला सर. वाघेला सर व्यवसायाने आर्किटेक्ट. पण हौसेने निसर्ग मित्र. पक्षी , फुले , वृक्ष , कीटक या सर्वांचा उत्तम अभ्यास असणारे. आज त्यांना दिलेला विषय होता ' परिसरातील पक्षी '. पक्ष्यांचे आकर्षक फोटो आणि सोबत पक्ष्यांचे हुबेहूब काढून दाखवलेले आवाज यामुळे यामुळे मुले खुश होती. एकूणच उद्याच्या दिवसाची भरपूर उत्सुकता या व्याख्यानाने तयार झाली होती. आमचा हेतू सफल झाला होता. वाघेला सरांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. व्याख्यानानंतर मी मुलांशी संवाद साधला. " मुलांनो आज व्याख्यानात जे जे पक्षी आपण फोटोत पाहिले त्यातील बरेच पक्षी उद्या आपल्याला प्रत्यक्ष बघायचे आहेत. उद्याच्या सहलीला गणवेश नाही. हवा तो पोशाख घाला. खूप ऊन आहे. त्यामुळे अंगभर कपडे राहू द्या. कपड्यांचे रंग मात्र भडक नकोत. निसर्गाशी मिळत्याजुळत्या रंगांं चे कपडे घाला. ज्यांच्याकडे घड्याळ आहे त्यांनी ते घालून या. आपल्याला काही निरीक्षणे नोंदवायची आहेत. त्यात वेळेचाही संदर्भ आहे. म्हणून...