Posts

Showing posts from June, 2019

#आधी हाताला चटके...

Image
आधी हाताला चटके... प्रबोधिनी म्हणजे सतत नवीन विचारांचा   खाद्यपुरवठा   होय.   प्रबोधिनीतील   प्रत्येक वर्ष हे   धमाकेदार असते.   यावर्षी सर्व शिक्षकांची   मिटिंग झाली आणि हे २०१८-१९ हे   शैक्षणिक   वर्ष  ‘ स्वच्छता वर्ष ’  म्हणून   साजरे   करायचे   असे ठरले.   आम्हाला हेही समजले   की   २०१९   हे   महात्मा गांधीजींचे   १५०   वे जयंती   वर्ष आहे.   मा. पंतप्रधान मोदीजींच्या ' मन की   बात ' मधून देखील   अनेकदा   स्वच्छता या विषयावर ऐकले होते.   ‘ एक कदम स्वच्छता की ओर ’ हे वाक्य अनेक माध्यमातून   सतत   कानावर पडत होतेच.   एखाद्या परिवर्तनाची   सुरुवात आपण   स्वतःपासून केली पाहिजे   असे म्हणतात.   नेमके याच वेळी आमच्या शाळेतील शिवराजदादाच्या   मनात   ‘ गच्ची बाग ’ हा एक विषय होता.   ही गच्ची बाग अधिकाधिक सुका   व जैविक कचरा   यांच्यापासून   सेंद्रियखत बनवून त्यातून   उभी करायची असे ठरले.   मग शाळेतील   कचऱ्याचा अभ्यास करून हा कचरा शाळेतच   जिरवायचे   आम्ही ठरवले.   कंपोस्ट खत निर्मिती हे माध्यम आम्ही त्यासाठी वापरले.   पण यात खूप   ज