#आधी हाताला चटके...
आधी हाताला चटके...
प्रबोधिनी म्हणजे
सतत नवीन विचारांचा खाद्यपुरवठा होय.
प्रबोधिनीतील प्रत्येक वर्ष हे धमाकेदार असते.
यावर्षी सर्व शिक्षकांची मिटिंग झाली आणि
हे २०१८-१९ हे
शैक्षणिक वर्ष ‘स्वच्छता वर्ष’ म्हणून साजरे करायचे असे ठरले.
आम्हाला हेही
समजले की २०१९ हे महात्मा गांधीजींचे
१५० वे जयंती वर्ष आहे.
मा. पंतप्रधान
मोदीजींच्या 'मन की बात' मधून देखील
अनेकदा स्वच्छता
या विषयावर ऐकले होते.
‘एक कदम स्वच्छता की ओर’ हे वाक्य अनेक
माध्यमातून
सतत कानावर पडत होतेच.
एखाद्या
परिवर्तनाची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे
असे म्हणतात.
नेमके याच वेळी आमच्या शाळेतील
शिवराजदादाच्या मनात
‘गच्ची बाग’ हा एक विषय होता.
ही गच्ची बाग अधिकाधिक सुका व जैविक कचरा
यांच्यापासून सेंद्रियखत बनवून त्यातून उभी करायची असे ठरले.
मग शाळेतील कचऱ्याचा अभ्यास
करून हा कचरा शाळेतच
जिरवायचे आम्ही
ठरवले.
कंपोस्ट खत
निर्मिती हे माध्यम आम्ही त्यासाठी वापरले.
पण यात खूप जास्त वास गच्चीवर
यायला लागला व त्यात खूप
अळ्याही झाल्या.
पण आम्ही खूप वाईट वाटून घेतले नाही.
कारण एक नक्की माहिती होते की Failure is a
first step
to success.
असा विचार करत असतानाच पेपर
मध्ये 'सायन्स एक्सपो'ची
बातमी वाचली.
लगेच आम्ही ऑटो
क्लस्टरला भेट दिली.
प्रदर्शनात अनेक
नवीन गोष्टींची ओळख झाली.
प्रदर्शन पाहताना 'वायू मित्र' पाटी पाहून कुतूहलाने आम्ही त्या
ठिकाणी गेलो.
असं वाटले की काहीतरी भन्नाट आयडिया आहे.
या प्रोजेक्टचा
मुख्य प्रियदर्शनदादा
याने आम्हाला खूप
उत्तमरित्या माहिती सांगितली.
त्याने सांगितलेली बायोगॅसबाबतची
संकल्पना मला खूप आवडली.
दुसऱ्या दिवशी लगेचच आम्ही देवळेकर सरांना कल्पना सांगितली.
त्यांनाही खूप आनंद झाला.
मग शिवराजदादाच्या सोबत आम्ही प्रियदर्शनदादाच्या घरी गेलो.
त्याच्या घरात त्याने केलेला प्रयोग
प्रत्यक्ष पाहिला.
मग त्याला आमच्या शाळेमध्ये बोलाविले.
एकदाचा बायोगॅस
प्लांट आमच्या गच्ची बागेमध्ये बसवायचा
निर्णय झाला.
या प्रकल्पासाठी inner wheel club of NIGDI pride यांनी संपूर्ण आर्थिक सहकार्य देण्याचे मान्य केले. त्यामुळे वेगात सर्व कामे सुरू झाली.
प्रियदर्शनदादाने
जागा व कचरा याबाबतची सर्व माहिती
आमच्याकडून मागितली.
त्यामुळे आमच्याही
अभ्यासाला सुरुवात झाली.
आमच्या शाळेत सात किलो
कचऱ्याचा बायोगॅस बसवणे
योग्य आहे, असे त्याला वाटले.
तेव्हा आमच्या लक्षात आले की दिवसभरात
शाळेत किती ओला
कचरा तयार
होतो.
ही आमच्यासाठी खूपच धक्का देणारी बाब होती.
बायोगॅस बसवायचा
दिवस उजाडला.
आम्ही बायोगॅस
प्रकल्पातील सर्व मुले मी, शौनक राऊत,
कैवल्य निकम, श्रवण वाडकर बायोगॅसच्या बांधणीसाठी
तयार झालो.
प्रदिपदादा व त्याचे सहकारी बायोगॅस बसविण्यासाठी
शाळेत आले.
आम्हीही
त्यांच्यासोबत खारीचा वाटा उचलला.
याचा
एक वेगळाच आनंद वाटत
होता.
यानंतर प्रदीप दादाने आम्हाला
बायोगॅसची सर्व माहिती सांगितली.
त्याची काळजी कशी घ्यायची
याचीही रीतसर माहिती दिली.
आमच्यासाठी हे एक मोठे आव्हान होते.
पण आयुष्यात अनेक आव्हानांना तोंड
देण्यासाठी मानसिक तयारी
करायची असते हे आम्ही शाळेतच शिकलो
आहोत.
म्हणून या आव्हानासाठी उभे राहायचे
धैर्य निर्माण झाले.
यानंतर बायोगॅसचा उद्घाटन समारंभ दिवस
उजाडला.
गणेशोत्सवाचा
मुहूर्त साधून
पिंपरी-चिंचवडचे उपायुक्त
मा. श्री. दिलीपजी गावडे व
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा
सौ. प्रतिभाताई दलाल यांच्या
हस्ते उद्घाटन झाले.
आम्ही खूप भारावून गेलो.
पण यानंतर आमची खरी परीक्षा होती.
आम्हाला वेळ दिली होती बारा ते सव्वा
बारा.
आम्ही दररोज कचरा घेऊन जायचो.
स्वयंपाक घरातील काकूंशी संवाद साधायचो.
त्यांच्या बरोबर गप्पा मारताना मज्जा
वाटायची.
प्रियदर्शन दादा
आम्हाला अधूनमधून फोन करून विचारायचा,
‘अरे, आज मित्राला किती
खायला घातले?’
आणि हा प्लांट
आमचा मित्र झाला.
आमची पहिली
सुरुवात अर्धा किलो कचऱ्यापासून झाली.
दर आठवड्याला
आम्ही अर्धा किलोने कचरा वाढवत जायचो.
हळूहळू कचरा दोन
किलोपर्यंत आला.
पण यावेळी
आमच्याकडून एक गोंधळ झाला.
तो म्हणजे चुकून
आम्ही एके दिवशी मित्राला तब्बल सहा किलो
कचरा खाऊ घातला.
आणि काहीतरी चुकले
हे लक्षात आले.
खूप भीती वाटली.
मग दादाला संपर्क
केला.
त्याने उपाय
सुचवला आणि मग मला जरा बरे वाटले.
उपाय होता
बायोगॅसला म्हणजेच आमच्या मित्राला एक आठवडा
खाऊ घालायचे नाही.
त्याचा सामू सहा आला होता.
मित्राचे पोट डेंजर बिघडले होते.
यानंतर आमचा मित्र जेव्हा बरा झाला
तेव्हा आम्ही परत
पहिल्यापासून सुरुवात केली.
यासोबतच मी व माझा मित्र श्रवण आम्ही
दोघेही दररोज गुगल
साईटवर माहिती अर्थातच रीडिंग भरत होतो.
यानंतर हिवाळा ऋतू
आला.
तेव्हापासून
आमच्या मित्राने अंथरूण धरले.
जवळपास त्याचा
सामू तीन वर आला होता.
मग प्रियदर्शनदादा
व प्रदीपदादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे
औषधोपचार सुरू
झाले.
आम्ही त्यासाठी
चुन्याचा उपचार करायचे ठरवले.
जवळपास एक
किलोच्या १४ पिशव्यांच्या मदतीने आम्ही
आमच्या मित्राला बरं करायचे
ठरवले.
यामध्ये त्याने
आम्हाला खूप साथ दिली.
मी व श्रवण शाळेत
असायचो, तेव्हा आम्ही
सारखा आमच्या या
मित्राचाच विचार
करत बसायचो.
सारखं त्याच्याजवळ
जाऊन बसायचो.
हळूहळू त्याची
तब्येत सुधारू लागली.
दोन आठवड्यानंतर
आमच्या मित्राला त्याचा फॉर्म गवसला.
आम्ही परत कचरा
टाकण्यास सुरुवात केली.
या कामादरम्यान
सुरुवातीला आम्हाला बरेच मुलं येताजाता
'बघा कचरावाले आले', असं म्हणून
चिडवायचे.
पण
आम्हाला माहिती होते की
आम्ही जे करतोय ते चांगल्यासाठी
करत आहोत.
पहिले मला देखील
कचऱ्यात हात
घालताना खूप कसतरी
वाटायचे.
पण जेव्हा कळले की
याचं फळ
खूप मोठ खूप मोठं
आहे तेव्हापासून आम्ही जोमाने काम करू लागलो.
आता सध्या आमचा
मित्र दररोज सात किलो कचरा जेवून१००० लीटर
गॅस आउटपुट देत
आहे.
हे सर्व करताना
प्रियदर्शनदादाने बायोगॅस बाबतीत एक मोठे
गेट-टुगेदर ठेवले
होते.
तेथे आम्हाला
ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाचे बायोगॅस प्रकल्पाचे
प्रेझेंटेशन
करण्याची संधी मिळाली.
आम्ही
तिचा पुरेपूर वापर करून
घेतला.
आम्हाला या
प्रेझेंटेशनसाठी खूप
मोठी शाब्बासकी
मिळाली.
ही शाब्बासकी
आम्हाला जेष्ठ
बायोगॅस संशोधक
श्रीयुत आनंदजी
कर्वे यांच्याकडून मिळाली.
आम्ही अजून जोमाने
कामास सुरुवात केली.
आज तुम्हाला
सांगताना आनंद होतोय की आमच्या शाळेच्या
स्वयंपाकघरात आमच्या बायोगॅसवर दिवसाला १०० जणांचा दोन
वेळचा चहा व साधारण
६०
जणांचा एक वेळेचा
भात तसेच दोन
वेळची
भाजी असे पदार्थ
तयार होतात.
यामुळे आमच्या
शाळेच्या आर्थिक
खर्चात बचत होते.
खरंतर एवढा चांगला
व निष्ठावंत मित्र याचा अनुभव आम्हाला
बायोगॅसने दिला.
बायोगॅस हा आमचा
बेस्ट फ्रेंड आहे.
आम्ही प्रियदर्शन
दादाला धन्यवाद सांगतो की त्याने मला
असा जिवलग मित्र
दिला.
शार्दुल देशमुख
इ. ९ वी
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय
|
किती छान लिहिलस शाबास शार्दुल व तुझ्या टीमच खूप खूप कौतुक
ReplyDeleteवाह! क्या बात है, उत्तम काम केले सर्वांनी, या प्रयोगापासून अनेकांना प्रेरणा मिळेल.
ReplyDeleteछान प्रयोगशील शिक्षकांचे गुणी विद्यार्थी.
ReplyDeleteअसाही मित्र असतो .असे नव्यानेच कळलं...शाब्बास मित्रांच्या मित्रांनो...Keep it up..
ReplyDeleteBRAVO ZULU,
ReplyDeleteFrom Submariner.
ATB RED 100