लेखमाला - डोळस भटकंती – लेख क्रमांक १
लेखमाला - डोळस भटकंती – लेख क्रमांक १ शाळा हळूहळू पूर्ववत सुरु होत आहे. दैनंदिन अध्ययन-अध्यापनापासून ते शैक्षणिक सहलीपर्यंत सगळ्याच गोष्टी टप्याटप्याने सुरु होतील. त्यामुळे या महिन्यापासून आपण एक लेखमाला सुरु करत आहोत. नाव आहे – डोळस भटकंती! जवळपास सर्वच शाळातून वार्षिक सहलींचे आयोजन केले जाते. या सहली योजताना नेमका काय विचार करायचा असतो? काय प्रकारचे नियोजन करायचे असते? कोणत्या प्रक्रिया सहलीत होतील याकडे शिक्षकांनी लक्ष द्यायचे असते? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे या लेखमालेतून तुम्हाला नक्की मिळतील असा विश्वास आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्रात या प्रकारचे उपक्रम राबवणारे अध्यापक शिवराज पिंपुडे यांचे शैक्षणिक सहलींचे अनुभव आपण या लेखामालेतून वाचणार आहोत. वीरगती जिवंत होते तेव्हा ... ७वीच्या वर्गावर इ तिहासाचा तास सुरू होता . ‘ इतिहासाची साधने ’ नावाचं एक प्रकरण आहे सातवीला . त्या साधनांचा एक प्रकार ...