Posts

Showing posts from January, 2023
Image
  अर्पिलेली वने... लोणावळ्याच्या दिशेने जाताना वाकसई नावाचे गाव लागते. महामार्गाला लागूनच एक मंदिर आहे. त्या मंदिर परिसरात आमच्या सहलीचा पहिला पडाव होता. ७५ वर्षीय ज्ञानेश्वर बगाडे मुलांशी बोलत होते. "तुकाराम महाराज खोपोलीला व्यापाराला जाताना या मार्गाने जायचे. पूर्वी हा बैलगाडीचा रस्ता होता. तुकाराम महाराज मिरची विकायला घेऊन जायचे आणि येताना मीठ आणायचे. एकदा ते त्यांची हातातली हेद्दी वृक्षाची काठी इथे विसरले. पावसाळ्यात ही काठी रुजली आणि त्याचे झाड झाले. नंतर एकाची अनेक झाडे झाली. तेव्हापासून हे ' तुकारामांचे झाड ' म्हणून ओळखले जाते..."   मुले डोळे विस्फारून सगळं ऐकत होती.   आता सहलीच्या मार्गदर्शिका विनयाताईंनी सूत्रे ताब्यात घेतली. “मुलांनो, आजूबाजूला बघा. तुम्हाला एकाच प्रकारची झाडे अधिक प्रमाणात दिसतील. नंतर त्यांची संख्या मोजा. ही सदाहरित झाडे आहेत. यांची पानगळ होत नाही...” खाली तर पाने पडलेली दिसत होती. त्यामुळे प्रश्न आलाच , " ताई, मग ही पाने कशी काय गळाली ?" एकाला एक लागून अशी बरीच प्रश्नोत्तरे झाली. " या झाडाला बारीक बारीक पांढरी फुले येता...