Posts

Showing posts from September, 2023
Image
  सात्विक कर्ता वा. ना. अभ्यंकर तथा भाऊ जन्म – १ मे १९४१, मृत्यू – १६ फेब्रुवारी २०२१ भाऊ मूळचे कोकणातले , देवगड तालुक्यातल्या नारिंग्रे या गावचे. वडिलांच्या करारी , निश्चयी वृत्तीचा भाऊंच्या मनावर खोल ठसा उमटला होता. अकरावी पर्यंतचे शिक्षण देवगडला झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी भाऊ पुण्यात आले. सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून B . A . चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.   ' तुमची नियुक्ती झाली आहे. ताबडतोब निघा. ' अशी नियुक्तीची तार देवगड हायस्कूलमधून भाऊंना प्राप्त झाली. पुन्हा एकदा जन्मगावच्या जवळ जाण्याची संधी भाऊंना मिळाली. त्या शाळेत त्यांनी अकरावीचे संस्कृत आणि गणित हे विषय शिकवले. पांढरे शुभ्र धोतर , पांढरा सदरा आणि त्यावर पांढरी टोपी असा भाऊंचा पेहराव असायचा . या त्यांच्या पेहरावात त्यांच्या तोंडून अस्खलित संस्कृत आणि इंग्रजी ऐकताना अनेकांना मोठे अप्रूप वाटे. दोन वर्षांनी बी.एड.च्या शिक्षणासाठी भाऊ पुन्हा पुण्यात आले. बी. एड. करत असतानाच ' नूमवि ' त शिकवायला त्यांनी सुरुवात केली. याच काळात भाऊंचा विवाह रत्नागिरीतील सुधा करमरकर यांच्याशी झाला. सुधाताईंचे