Posts

Showing posts from December, 2023

मंतरलेली रात्र...!

Image
  मंतरलेली रात्र...! गाडीतून अजून उतरलो पण नव्हतो तोच "ए तो बघा तारा पडतोय." एक जण जवळजवळ किंचाळलाच. तो कुठे काय दाखवत आहे हे समजेपर्यंत ती गोष्ट लुप्तही झाली होती. काही सेकंदाचा खेळ केवळ! पण आजची रात्र भन्नाट असणार याची चुणूक मुलांना मिळाली होती. "अरे यार विश धरलीच नाही मनात ," प्रथमेशने खंत बोलून दाखवली. ' टुटता तारा ' हिंदी चित्रपटातील एक परवलीचा शब्द. त्याला बघून मनात धरलेली इच्छा पूर्ण होते हाही (गैर)समज चित्रपटांनी जनसामान्यात चांगलाच रुजवला आहे. १३ डिसेंबरची ती रात्र होती. साडेआठच्या सुमारास तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी जवण गावात आम्ही पोहोचलो होतो. आम्ही म्हणजे मी , अमेय , सुप्रियाताई, सूरज आणि शाळेतील सहावी-सातवीतील पंधरा विद्यार्थी. दहा मुलगे आणि पाच मुली. या पंधरा जणांपैकी पैकी दहा जण होमी भाभाच्या दुसऱ्या राउंडसाठी निवडली गेली होती ; तर पाच जण राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रकल्प स्पर्धेत जिल्हा पातळीवरील विजेती होती. मुलांना बक्षीस काय द्यायचं हा विचार विभागात सुरू असतानाच मयुरेशदादाचे उल्का वर्षाव निरीक्षणाचे फ्लायर एका गटावर बघायला मिळाले. आकाश द