दर्शन... वारसा स्थळांचं! वेळ सकाळी आठची. ठिकाण पुण्यातील काँग्रेस भवन. निमित्त होतं हेरिटेज वॉकचं. वारसा स्थळांचं दर्शन घेण्याचं. इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे सर तळमळीनं मुलांशी बोलत होते , " मुलांनो १९४२ मध्ये महात्मा गांधीनी इंग्रजांविरुद्ध’ ' चले जाव ' ची चळवळ सुरु केली आणि भारतीयांना मंत्र दिला ' करेंगे या मरेंगे ' चा! ‘ आता स्वातंत्र्य मिळेपर्यंत माघार घ्यायची नाही,’ असं गांधीजीनी निक्षून सांगितलं. इंग्रजांनी स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेत्यांची लगेच धरपकडक सुरु केली. ' नेते तुरुंगात गेले म्हणून काय झाले आम्ही लढणार ,' असं भारतीयांनी ठरवलं. सोळा वर्षांचा एक मुलगा नारायण दाभाडे. कसबा पेठेत राहणारा. महात्मा गांधींविषयी प्रचंड आदर बाळगणारा. आपणही काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं आपल्या मित्रांना जमवून काँग्रेस भवानाकडे त्यानं एके दिवशी कूच केली. त्याच्या हातात तिरंगा झेंडा होता. त्यावेळेसचा तिरंगा झेंडा ; ज्यात मध्यभागी अशोक चक्र ऐवजी चरखा होता. हे काँग्रेस भवन इंग्रजांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावर त्यांचा झेंडा युनियन जॅक फडकत होता. इंग्...
Posts
Showing posts from March, 2024