Posts

Showing posts from April, 2024
    किनारा ... दिवस पहिला पाणी एकदम संथ होतं . हवेत छान गारवा होता . त्या भाट्याच्या खाडीत आमची सोडून दुसऱ्या कुण्णाची होडी आमच्या नजरेत तरी नव्हती . आमची होडी नव्हती ; सांगड होती . त्यामुळे शरीराला कुठेही हेलकावे नव्हते आणि म्हणूनच की काय मन आजूबाजूच्या दृश्यावर स्थिर झालं होतं . दोन्ही बाजूंनी झाडांची दाटी , त्या हिरव्या रंगांच्या विविध छटा , पाण्यात उतरलेली ती हिरवाई , आकाशात नानाविध पक्ष्यांची निवासस्थानाकडे जायची सुरु असलेली लगबग , मधूनच पाण्यातून उड्या मारणारे मासे ... एका अत्यंत विलोभनीय अशा दृश्याचे साक्षीदार झालो होतो आम्ही . " आधी आपण या जुवे गावात उतरू . इथे एक वेगळी गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल ." सुरेंद्रदादाच्या आवाजाने सगळेच भानावर आले . " जुवे शब्दाचा अर्थ होतो बेट . हे बेटच आहे ; खाडीतील बेट ! कोकणातल्या प्रत्येक खाडीत जुवे नावाचं गाव आहे . पूर्वी घरातून बाहेर पडलं की आधी होडीत बसल्यावर मगच कुठल्यातरी जमिनीला लागता येत होतं . आता मात्र बांध घा