एक रोमहर्षक (स्वयंपूर्ण) लढाई... आपल्या व्हाट्सअॅप मधील काही ग्रुप तात्पुरते असतात. काम झालं की आपण ते डिलीट करतो. पण माझा एक ग्रुप काम झालं की दहा महिन्यांसाठी सुप्तावस्थेत जातो. दिवाळीच्या साधारण महिनाभर आधी तो जागृत होतो आणि भडाभडा वाहू लागतो. थोड्याच दिवसात त्याचं बारसंही होतं. जुनं नाव बदलून नवीन नाव तो धारण करतो. आणि मग ते नाव प्रत्यक्षात आणण्यासाठी २० ते २५ जणांची एक टीम जोरदार प्रयत्न करते... लेखाच्या विषयाबाबत काहीच समजत नाहीये ना ??? सांगतो. पुण्यात इतिहास प्रेमी नावाचं मंडळ आहे. प्राध्यापक मोहन शेटे मंडळाचे अध्यक्ष आहेत. या मंडळातर्फे गेली २० वर्षे दिवाळीत शिवचरित्रातील एखादी लढाई दृकश्राव्य म्हणजे ध्वनीचित्राच्या माध्यमातून पडद्यावर आणि प्रतीकृतीच्या आणि दिव्यांच्या माळांच्या माध्यामतून जमिनीवर दाखवली जाते. साधारण पंधरा बाय पंधरा फुटाची युद्धभूमी तयार केली जाते. लढाईची पार्श्वभूमी , प्रत्यक्ष लढाईचं रसभरीत वर्णन , लढाईचे परिणाम सांगणारी एक प्रेरणादायी स्क्रिप्ट शेटे सर लिहितात. त्यांच्याच भारदस्त आवाजात ती रेकॉर्ड होते. आवाजाला फोटो आणि व्हिडिओची जोड दिली जाते. ...
Posts
Showing posts from November, 2024