Posts

Showing posts from June, 2025
  आणि बुद्ध प्रसन्न झाले...!   " रोहित, अरे उठ पटकन ." एकदम दबक्या आवाजात मी रोहितला आवाज दिला . मध्यरात्रीचा दोनचा सुमार होता . रोहितचा डोळा लागला होता . माझा आवाज ऐकून हातानेच काय झाल असं त्यानं विचारलं . " पाणवठ्याच्या पलीकडच्या बाजूला काळा ठिपका दिसतोय बघ ." ताडकन उठून रोहितनं मचाणाच्या झरोक्याला तोंड लावलं . " नाही ओ . काही नाहीये . झाडाची सावली आहे ती ."  " अरे बघ ना नीट हालतोय की थोडासा ठिपका तो ." असं मी म्हणेपर्यंत ते काहीतरी हालणारं पाणवठ्याच्या त्या बाजूवरून काठाकाठाने चक्क आमच्या बाजूला आलं . चंद्रावर ढग आले होते . त्यामुळे प्रकाश मंदावला होता . डोळे फाडफाडून आमच्या समोर नेमकं काय आहे ते बघण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो . " अरे हे तर सिवेट ( civet ) आहे सर ." रोहित कुजबुजला . " म्हणजे उदमांजर ना ?" " होय होय ." उदमांजर आमच्यावर उदार झालं होतं. आता ते चक्क आमच्या मचाणाच्या दिशेनं येऊ लागलं. मचाणाच्या शिडीपाशी येऊन ते थांबलं. आमच्याकडे रोखून बघू लागलं . एकदम काळकुळकुळीत होतं. शेपटी लांब आण...