#जमाडी जम्मत, खेळण्यांची गम्मत
जमाडी जम्मत, खेळण्यांची गम्मत गोष्ट २०११ मधली आहे. धुळे जिल्ह्यातील एका अध्यापक प्रशिक्षण वर्गासाठी मा. विवेकराव पोंक्षे , मा. महेंद्रभाई सेठिया यांच्यासोबत गेलो होतो. वर्गाला गेल्यावर समजलं , मी प्रशिक्षण ‘ देण्यापेक्षा ’ माझं प्रशिक्षण ‘ होणं ’ हा मला नेण्यामागचा मुख्य हेतू होता. असो. तिथे एका धडपड्या अध्यापकांची ओळख झाली. संध्याकाळचं जेवण नेमकं त्याच अध्यापकांच्या घरी होतं. घरी गेल्यावरही त्यांनी त्यांच्या मुलांसाठी कुठून कुठून आणलेली खेळणी दाखवायला सुरवात केली. खूपच वैविध्य होतं खेळण्यांं त. मी सहज म्हंटलंं , ‘ शाळेत खूप उपक्रम करता तुम्ही. आता गल्लीतही एक खेळणीघर सुरू करा. ’ यावर महेंद्रभाई लगेच म्हणाले , ‘ अरे असते अशी लायब्ररी तुला माहीत नाही का ? तुझ्या घराजवळ चिंचवडलाच आहे. ’ हा माझ्यासाठी धक्का होता. एक तर अशी काही लायब्ररी असते आणि तीही माझ्या घराजवळ चालते यातलं मला काहीच माहीत नव्हतं. माझी उत्सुकता चाळवली गेली. भाईंकडून क्रमांक घेतला. आणि धुळ्यावरून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी लायब्ररीत जाऊन धडकलो. खूपच छान ...