#खेळ खेळण्यातून घडवताना...
खेळ खेळण्यातून घडवताना... जम्मत घरात पझल लायब्ररीची सुरुवात नुकतीच झाली होती. मा. विवेकराव पोंक्षे सर (उपकार्यवाह, शिक्षण प्रभाग, ज्ञान प्रबोधिनी) म्हणाले , ‘ वेबसाईटसाठी छोटा व्हिडिओ बनवूयात पझल लायब्ररीवर. ' स्वतः आले त्या दिवशी. अर्ध्या तासात काम झालं. सरांनीही एक बाईट दिला. जाताना म्हणाले , ' छान सेट झालीये लायब्ररी. पण तू खेळण्यांना साधने म्हणतोस तर नेमकं काय शिक्षण होतं मुलांचं ; असं काही पाहिल यं स का ? काही निरीक्षणं करता येतील का ? नोंदी करता येतील का ?' असा काही विचारच केला नव्हता मी अद्याप. सरांनी जाता जाता डोक्यात एक पिल्लू सोडलं होतं. माझं विचारचक्र सुरू झालं. थोडं फार लेखनही सुरु झालं. सरांशी फोनवर चर्चा सरू झाली . सहा-सात दिवस चालला हा कार्यक्रम. पण त्यातून एक विषय आकार घेत होता – ' खेळण्यांच्याद्वारे मुलांच्या निरीक्षणात्मक नोंदी. ' परत एकदा आमच्याकडे असणारी खेळणी आम्ही नीट पाहिली. एखाद्या खेळण्याशी मूल खेळत असेल तर त्याच्याविषयी कोणत्या गोष्टी...