#राकट देशा कणखर देशा 'गडां'च्याही देशा...
राकट देशा कणखर देशा 'गडां'च्याही देशा... (अभ्यास सहल क्र.२) ‘परत’ एकदा इतिहासाचा तास. परत शब्दाचा संदर्भ मागील विरगळींवरचा ब्लॉग. ‘मग आवडलं का कालचं डॉ. संग्राम इंदोरे यांचं व्याख्यान? किती घटक समजले एखाद्या किल्ल्याच्या निरीक्षणाचे?’ ‘दादा व्याख्यान छान झालं. मी २९ घटकांची यादी केलीये.’ ‘मी ३०.’ ‘दादा माझे ३२ घटक.’ ‘ठीकये ठीकये. चला आपण फळ्यावरच यादी करू. सांगा एकेक घटक.’ ‘घेरा, तटबंदी, बुरुज, महाद्वार, दिंडी दरवाजा.... मुले सांगू लागली. मी फळ्यावर हात चालवू लागलो. मोजून ३१ घटकांची यादी झाली. ‘बरं याशिवाय अजून कोणती माहिती आपल्याला असायला हवी? आपण मिळवायला हवी?’ ‘दादा किल्ल्याची उंची.’ ‘किल्यावर घडलेला इतिहास.’ ‘आजूबाजूचे किल्ले.’ ही सुद्धा यादी १०, ११ पर्यंत गेली. पुढच्या तासाला याबाबतचा आणखी एक लेख वाचून दाखवला. त्यात किल्ल्यावर जाण्यापूर्वी करायचा अभ्यास, प्रत्यक्ष किल्ला पाहताना केलेल्या नोंंदी, पडलेले प्रश्न आणि नंतर त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा केलेला प्रयत्न असे तीन टप्पे छान सांगितले होते. ‘चला पूर्वतयारी उत्तम झाल...