#करोनाच्या नजरकैदेत...भाग - २
करोनाच्या नजरकैदेत...भाग २ "हॅलो अनघा." "बोला दादासाहेब." "अग सातवीसाठी एक उपक्रम सुरू केला आहे. तुझी थोडी मदत हवी होती." 'सांगा की दादा." या टोनमध्ये इतका उत्साह व आश्वासकता होती की माझे काम पूर्ण होणार याची खात्री पटली. मग एक छोटा संवाद झाला दोघांचा. आणि सुरू झाला आणखी एक उपक्रम. सातवीच्या दोन्ही वर्गावर रोज सकाळी अनघा एक कविता पोस्ट करू लागली. विद्यार्थ्यांनी ती तीन-चार वेळा वाचून नंतर त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग करून ग्रुप वर पाठवणे अपेक्षित होते. संध्याकाळी अनघा ती कविता स्वतः वाचून त्याचे रेकॉर्डिंग पाठवू लागली. सोबत त्या कवितेचा अर्थही सांगू लागली. इतकेच नाही तर ज्यांनी ज्यांनी रेकॉर्डिंग पाठवले आहे त्यांचे ऐकून त्यांना प्रतिसादही देऊ लागली. 'कृष्णा, तुझा आवाज काव्य वाचनासाठी एकदम छान व गोड आहे. पण ही कविता खूप घाईघाईत म्हटली आहेस तू. थोडी सावकाश म्हण. क्षण क्षण शब्द तर खूप घाईत झाला आहे.' 'आर्या, छान म्हंटली आहेस. चाल पण चांगली आहे. पण श्वास कुठे घ्यायचाय हे आधी ठरवायला हवं. कडव्याच्या शेवटच्या ओळी...