Posts

Showing posts from December, 2024
  1 गरज आणि महत्त्व १ सध्या अध्ययन - अध्यापन प्रक्रिया ही खूपच तंत्रस्नेही झाली आहे . अनेक अध्यापक उत्तम पीपीटी तयार करून पाठ घेताना दिसतात . तसेच विद्यार्थीही तंत्रज्ञानाची अनेक साधने वापरण्यात वाकबगार झाली आहेत . परंतु केवळ फोटो , व्हिडिओ यातच शिक्षण प्रक्रिया अडकून पडली तर ते धोक्याचे होईल , आभासी ( व्हर्च्युअल ) ते प्रत्यक्ष ( रियल ) हा प्रवास होण्यासाठी क्षेत्रभेटी महत्त्वाच्या ठरतात . करोनाचा काळ ही आत मागे पडला आहे . सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत . शिक्षण प्रक्रिया ही यास अपवाद नाही . त्यामुळे पूर्वी प्रमाणे अनेक शाळांनी क्षेत्रभेटी योजण्यासही सुरुवात केली आहे . २ इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी आहे . यात अर्थातच मराठ्यांच्या इतिहासावर भर आहे . मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित अनेक ऐतिहासिक ठिकाणी पुणे जिल्ह्यात आहेत . उदाहरण घ्यायचे झाले तर एका पुणे जिल्ह्यात तब्बल २९ किल्ले तर सुमारे २५ ऐतिहासिक संग्रहालये आहेत . त्यामुळे या प्रकारच्या क्षेत्रभेटी योजणे सहजच शक्य आहे . ३ बहुतांश शाळेतून विद्यार्थ्यांना इतिहास हा विषय फारसा आव...