
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील इ. ७ वीच्या विद्यार्थ्यांचं ग्रामीण जीवन परिचय शिबिर नुकतंच पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील वेल्हा गावातील ज्ञान प्रबोधिनीच्या सुसज्ज वास्तूत संपन्न झालं. चार दिवस झालेल्या या शिबिरातील एका दिवसाचं अनुभव कथन या लेखातून आपल्याला वाचायला मिळेल. शैक्षणिक सहलींप्रमाणे शिबिर हेही अनुभव शिक्षणाचं एक महत्त्वपूर्ण साधन कसं आहे; हे या लेखातून ठळकपणे लक्षात येतं. ......................................................................................... एक दिवस निवासी शिबिरातील... सकाळी सातच्या सुमारास आमचे १३० विद्यार्थी ८ गटांमध्ये उभे राहतच होते तोवर आठ मॅक्स गाड्या शिबिर स्थळी येऊन थडकल्या. लगेचच एकेका गाडी एकेक गट ' बसवण्यात ' आला. ‘थोडाच(या शब्दावर जोर देत) प्रवास आहे रे. ऍडजेस्ट(या शब्दावर आघात देत) करून घ्या.’ अशी ' प्रेमळ ' सूचना समाधानदादा प्रत्येक गाडीतील गटाला देत होते. मुले बसताच गाडी आपल्या नियोजित गावासाठी प्रस्थान करत होती. पासली, नाळवट, जाधववाडी, बालवड अशी एकूण ८ गावे निश्चित करण्यात आली होती. आमचं गाव होत...