#लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास - भाग ६
नभ झाकोळूनी गेले... 'दादा सध्या नजर कुठे लावून आहात?' हल्ली हा प्रश्न सतत विचारला जातोय. आणि प्रत्येक वेळी वेगळं उत्तर द्यायला मलाही जमलंय. यावेळचं उत्तर होतं... त्याचं असं झालं... प्रशांत दिवेकर सरांशी फोन सुरू होता. ई-प्रशिक्षकसाठी मी लिहित असलेल्या लेखासंदर्भात. ढीग सूचना करत होते सर माझ्या लेखावर. एकदाच्या त्या झाल्यावर सरांना म्हटलं, "प्रशांत सर माझ्या डोक्यातील परिसर निरीक्षणाचे घटक संपले बुवा. सुचवा की काही." "ढगांचे निरीक्षण करता येईल बघ," लगेच उत्तर. जणू माझ्या या प्रश्नाची ते वाटच पाहत होते; इतकं लगेच. "सध्याचा काळही यासाठी उपयुक्त आहे आणि." विषय आवडला होता आपल्याला. व्यक्तीशोध मनातून सुरु होण्याआधीच; "सुरेंद्रला वेळ काढायला सांग." नावही पुढयात (कानात) येऊन पडलं होतं. एका हातानं प्रशांतसरांचा फोन ठेवला आणि दुसऱ्या हातानं सुरेंद्रदादांना फोन लावला. "हो. चालेल की." सुरेंद्रदादाचं बोलणं मोजकं व नेमकं. दोन दिवसात तारीखही निश्चित झाली. मुले मराठी माध्यमातील आहेत हे समजल्यावर सुरेंद्रदादानं सर्व ppt आवर्जून मराठीतून ...