Posts

Image
  सात्विक कर्ता वा. ना. अभ्यंकर तथा भाऊ जन्म – १ मे १९४१, मृत्यू – १६ फेब्रुवारी २०२१ भाऊ मूळचे कोकणातले , देवगड तालुक्यातल्या नारिंग्रे या गावचे. वडिलांच्या करारी , निश्चयी वृत्तीचा भाऊंच्या मनावर खोल ठसा उमटला होता. अकरावी पर्यंतचे शिक्षण देवगडला झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी भाऊ पुण्यात आले. सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून B . A . चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.   ' तुमची नियुक्ती झाली आहे. ताबडतोब निघा. ' अशी नियुक्तीची तार देवगड हायस्कूलमधून भाऊंना प्राप्त झाली. पुन्हा एकदा जन्मगावच्या जवळ जाण्याची संधी भाऊंना मिळाली. त्या शाळेत त्यांनी अकरावीचे संस्कृत आणि गणित हे विषय शिकवले. पांढरे शुभ्र धोतर , पांढरा सदरा आणि त्यावर पांढरी टोपी असा भाऊंचा पेहराव असायचा . या त्यांच्या पेहरावात त्यांच्या तोंडून अस्खलित संस्कृत आणि इंग्रजी ऐकताना अनेकांना मोठे अप्रूप वाटे. दोन वर्षांनी बी.एड.च्या शिक्षणासाठी भाऊ पुन्हा पुण्यात आले. बी. एड. करत असतानाच ' नूमवि ' त शिकवायला त्यांनी सुरुवात केली. याच काळात भाऊंचा विवाह रत्नागिरीतील सुधा करमरकर यांच्याशी झाला. सुधाताईंचे ...
Image
  कातळातील सृजनाची कथा... एकदाचे कामशेत जवळील बेडसे लेणीत पोहोचलो. सुमारे ४३५ पायऱ्या असतील. (बसमध्ये असताना  जे मोजता येईल ते सगळे मोजा, अशी सूचना मुलांना केली होती त्यामुळे  काहींनी पायऱ्या  मोजल्या होत्या.) २०- २५ मिनिटे लागली चढायला. सगळेच घोटभर पाणी प्यायले  आणि सावली शोधून विसावले. तितक्यात चैत्यगृहातून प्रार्थनेचे स्वर ऐकू येऊ  लागले. हे थोडे विशेष होते माझ्यासाठी. दोन-तीन वेळा येऊन गेलोय इथे मी. पण कधी  प्रार्थना ऐकली नव्हती. उत्सुकतेने आत डोकावलो. स्तूपावर गौतम बुद्धांची छोटी मूर्ती  ठेवली होती. स्तुपाच्या खाचातून दिवे लावले होते. फुले वाहिली होती. आणि चार जण  बुद्ध वंदना करत होते. चैत्यगृहातील वातावरणामुळे ती प्रार्थना अधिकच धीरगंभीर वाटली. चटकन बाहेर  आलो. "मुलांनो लगेच रांगा करून आत बसा." वातावरणच असे होते की मुलांना शांत  बसा हे सांगायची गरजच लागली नाही. थोड्या वेळाने प्रार्थना थांबली. सहज संवाद सुरु  झाला. " दर रविवारी करता का प्रार्थना ?" " अहो आज पौर्णिमा आहे. दर पौर्णिमेला  कोणत्यातरी लेणीमध्ये जाऊन आम्ही...