Posts

Showing posts from March, 2024
  दर्शन... वारसा स्थळांचं! वेळ सकाळी आठची. ठिकाण पुण्यातील काँग्रेस भवन. निमित्त होतं हेरिटेज वॉकचं. वारसा स्थळांचं दर्शन घेण्याचं. इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे सर तळमळीनं मुलांशी बोलत होते , " मुलांनो १९४२ मध्ये महात्मा गांधीनी इंग्रजांविरुद्ध’ ' चले जाव ' ची चळवळ सुरु केली आणि भारतीयांना मंत्र दिला ' करेंगे या मरेंगे ' चा! ‘ आता स्वातंत्र्य मिळेपर्यंत माघार घ्यायची नाही,’ असं गांधीजीनी निक्षून सांगितलं.   इंग्रजांनी स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेत्यांची लगेच धरपकडक सुरु केली. ' नेते तुरुंगात गेले म्हणून काय झाले आम्ही लढणार ,' असं भारतीयांनी ठरवलं. सोळा वर्षांचा एक मुलगा नारायण दाभाडे. कसबा पेठेत राहणारा. महात्मा गांधींविषयी प्रचंड आदर बाळगणारा. आपणही काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं आपल्या मित्रांना जमवून काँग्रेस भवानाकडे त्यानं एके दिवशी कूच केली. त्याच्या हातात तिरंगा झेंडा होता. त्यावेळेसचा तिरंगा झेंडा ; ज्यात मध्यभागी अशोक चक्र ऐवजी चरखा होता. हे काँग्रेस भवन इंग्रजांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावर त्यांचा झेंडा युनियन जॅक फडकत होता. इंग्...
  दुर्गजागर २०१९ मध्ये १० महिन्यात पुणे जिल्ह्यातील २९ किल्ले सर करण्याचा पराक्रम ज्ञान प्रबोधिनीतील शालेय विद्यार्थ्यांनी केला. ही कल्पना होती विद्यालयाचे इतिहास विषयाचे अध्यापक व पूर्व माध्यमिक विभागाचे प्रमुख श्री. शिवराज पिंपुडे यांची. वाचूयात तर मग त्यांच्याच शब्दात या मोहिमेचे वर्णन...   मोहिमेची घोषणा इयत्ता सातवीला मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ वर्गात बसून शिकवता-शिकता येत नाही. त्यासाठी एक तरी किल्ला अनुभवावा लागतो. म्हणून दरवर्षी सातवीच्या मुलांना घेऊन कुठल्यातरी किल्ल्याचा माथा आम्ही गाठतोच. ऑक्टोबर २०१८ मध्ये मुलांना घेऊन कोरीगडावर गेलो होतो. किल्ला उतरताना मित्रवर्य निलेशजी गावडे यांना विचारले “गावडे सर पुणे जिल्ह्यात एकूण किती किल्ले येतात ओ?” “२९!” गावडे सरांचा तत्पर प्रतिसाद. “ काय म्हणताय !” (धक्का होता मला हा.)   ‘आपण ज्या जिल्ह्यात राहतो तो जिल्हा तरी आपण नीट बघितला पाहिजे; मुलांना दाखवला पाहिजे...’ माझं स्वगत! मार्च महिना उजाडला. कोरीगडावरील स्वगत विसरलो नव्हतो मी. ‘मंडळी आज संध्याकाळी भेटूया,’ असा निरोप धाडला ...