Posts

Showing posts from January, 2019

#या हृदयीचे त्या भिंतींवर...

Image
 या हृदयीचे त्या भिंतींवर ...  मागच्याच्या मागच्या मे महिन्यात शाळेचं रंगकाम निघालं.  प्रत्येक वर्ग वेगळ्या रंगाने रंगवण्याचं ठरलं.  या रंगकामात मुलांचाही काही सहभाग घेऊयात असं वाटून   गेलं.  त्यासाठी प्रत्येक वर्गातील मागची भिंत न रंगवता प्रायमर   देऊन   तशीच ठेवण्यात आली.   शाळा सुरु झाली आणि या पांढऱ्या रंगानंं विविध रूपंं धारण   करण्यास सुरवात केली.  हातांच्या ठशांपासून ते फुटबॉलच्या शिक्क्यापर्यंत आणि  स्वाक्षरीपासून ते शाईच्या डागापर्यंत सर्वांनी भिंत सजू लागली.  आता काहीतरी तातडीन करण्याची गरज निर्माण झाली होती.  जम्मत घराने योजलेल्या एका कार्यशाळेच्या माध्यमातून   आभाताईंंचा परिचय झाला होताच.  ..................................................   इ. ९ वी क चा वर्ग.  वेळ सकाळी ९ ची.  वर्गातील बाकांची रचना बदलेली.  सर्व बाकं फळ्याच्या बाजूने, दाटीदाटीने.  आज फळा म्हणून मागची भिंत.  वर्गात फक्त १५-१६ मुलंमुली, आभाताई व...