Posts

गोष्ट एका राष्ट्रीय उद्यानाच्या भेटीची!

Image
  गोष्ट एका राष्ट्रीय उद्यानाच्या भेटीची! मणिपूर दौऱ्यातील (मे २०२६) पहिल्याच दिवशी जगात एकमेवाद्वितीय असणाऱ्या एका राष्ट्रीय उद्यानास भेट देण्याचे माझे नियोजन होते. IGAR South या सैन्याच्या कॅम्पमधून सकाळी ९.३० च्या सुमारास प्रवासात सुरुवात केली. सध्या या ठिकाणी पोस्टिंग असणारा आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी कॅप्टन पृथ्वीराज निघोट (21 para Special Forces ) यानेच गाडी आणि चालक   ठरवून दिला होता. (पृथ्वीराज याची शाळेतील batch २०१६ ची. नंतर NDA मधून ट्रेनींग पूर्ण करून साधणार ३ वर्षे तो ईशान्य भारतात सेवेत रुजू आहे.) माझ्या गाडीचा चालक होता मुश्ताक. "येथील नागा , कुकी , मैतयी जनजातींमधील दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुसलमान चालक असणं सेफ आहे तुमच्यासाठी ," इति पृथ्वीराज . (मे महिन्यात याची भेट झाली आणि ऑगस्ट महिन्यात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या whatsapp गटावर एक बातमी आली – पृथ्वीराज निघोट याला   ईशान्य भारतातील शौर्यपूर्ण कामगिरीसाठी सेना पदक ( Gallantry ) जाहीर! असा ऊर अभिमानाने भरून आला ना ; काय सांगू.!! आज मणिपूरमध्ये सगळं सुरळीत होतं. बस आजचा दिवस मिळाला होता ...

अभ्यास दौऱ्यांची मी अनुभवलेली सूत्रे

Image
  अभ्यास दौऱ्यांची मी अनुभवलेली सूत्रे   दोन आठवड्यांपूर्वी आबा दादांचा फोन आला होता आणि वैचारिक आहे तुमच पुणे केंद्रात असे त्यांनी सांगितलं. पुढच्या आठवड्यात संचालक निगडित आले होते. ते म्हणाले गप्पा मारायला ये रे पुण्यात.   गप्पा शब्द ऐकल्यावर हुश्श वाटल. पण पुणे केंद्राला गप्पा मारायला , ऐकायला आवडतात का असा एक प्रश्न मनात घेऊनच तुमच्या समोर उभा आहे. त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे की   तुम्ही सगळ्यांनी गप्पा ऐकण्याच्या मनस्थितीत बसाव. देशप्रश्न सोडवण्याची जबाबदारी आपल्यावर नक्की आहे   पण ती चेहऱ्यावर दिसलीच पाहिजे असा काही नियम नाहीये. विषय ठरला आहे अभ्यास दौऱ्यातील मला सापडलेली सूत्रे. ढोबळ विषय मला समजल्यानंतर मीच हा विषय नेमका केला. पण तरी जसा विचार करत गेलो तस विषयाच्या शीर्षकात काही बदल मला करावेसे वाटले.   एक तर अभ्यास दौरा हा शब्द माझ्या   व्यक्तिमत्वाला जाणारा नाही अस मला वाटलं.   भटकंती शब्द अधिक योग्य राहील आणि सापडलेली सूत्रे म्हणण्यापेक्षा अनुभवलेली सूत्रे असा शब्द अधिक योग्य राहील असही वाटलं. मंडळी मुळात भटकंतीची हौस असावी ...