Posts

Showing posts from August, 2026
 एक विलक्षण अनुभव  मणिपूर दौऱ्यातील पहिल्याच दिवशी जगात एकमेव असणाऱ्या एका ठिकाणास भेट देण्यास निघालो होतो मी. IGAR South या सैन्याच्या कॅम्पमधून सकाळी ९.३० च्या सुमारास प्रवासात सुरुवात केली. सध्या या ठिकाणी पोस्टिंग असणारा आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी कॅप्टन पृथ्वीराज निघोट ( asam 21 para ) यानेच गाडी ठरवून दिली होती. चालक होता मुश्ताक. "येथील जनजातींच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुसलमान चालक असण सेफ आहे तुमच्यासाठी ," इति पृथ्वीराज . आज मणिपूरमध्ये सगळं सुरळीत होतं. बस आजचा दिवस मिळाला होता तर आम्हाला. अशीच परिस्थिती आहे मणिपूरची. इथे काम करणारे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते गमतीने मणिपूरला ‘बंदपूर’ म्हणतात. कधी कुठे खुट्ट होईल आणि पुढच्या मिनिटात सगळं बंद होईल काहीच सांगता येत नाही . प्रदीर्घ दंगलीनंतर नुकतच मणिपूर शांत झाल होत. पण दंगलीच्या खाणाखुणा या प्रवासात जागोजागी दिसत होत्या. पूर्णच्या पूर्ण जळून काळेठिक्कर पडलेले ट्रक , टॅंकर रस्त्याच्या बाजूला लावलेले दिसले. जागोजागी जवान पहारा देत सज्ज असलेले दिसले . थोड्याच वेळात आम्ही भिष्णुपूर जिल्ह्यात प्रवेश केला....