#रंग पेरताना...
२२ ऑक्टोबर २०१८!
अस्मादिकांच्या वाढदिवसाचा दिनांक!!
मग आज काय 'नवीन' दादा?
हा प्रश्न चहूबाजूंनी आसमंतात उठणार हे ज्ञात होतंच.
म्हणून जाणीवपूर्वकच आजची वेळ गाठून आर्या व आभाताई यांची भेट घडवली.
आता कोण ही आर्या ?
हो, सांगतो.
आमची आठवीतील एक गुणी विद्यार्थिनी .
उत्तम चित्र काढते.
आभाताईंच्या चार पाच भित्तिचित्र कार्यशाळेत सहभागी होती.
मग स्वतःच्या घराच्या भिंतीही रंगवल्या.
एकूणातच काय? कला आहे मुलीच्या हातात... डोक्यात...
शाळा म्हणून तिच्यासाठी काही करता येईल का असा विचार गेल्या तीन चार महिन्यांपासून सुरू आहे.
आज घडवून आणलेली भेट हा त्या विचारांचाच एक भाग.
आज अखेर बारा भित्तिचित्र कार्यशाळांनी आभाताई चांगल्याच परिचित आहेत माझ्या.
पण आज आभाताईंचं एक वेगळंच 'दर्शन' झालं.
त्यांना भेटीचा विषय माहीत होता.
ठरलेल्या वेळेत त्या अगदी 'तयार' होत्या.
म्हणजे चहा वगैरे करून
आणि आर्याचं पुढे काय करायचं याचं चक्क टिपण काढूनही.
घरात गेल्यागेल्या आपण एका कलाकाराच्या घरात आलोय याचा कुणालाही अंदाज यावा.
रंग रेघोट्यांनी सजलेल्या (नीरस व्यक्तीच्या मते खराब केलेल्या) भिंती.
स्वतःच्या उत्तम चित्रांच्या भिंतीवर टांगलेल्या फ्रेम्स्.
आणि हे कमी की काय म्हणून एका कोपऱ्यात कागदी कोलाजचं भिंतीवर भलं मोठं खोड आणि त्या झाडाच्या फांद्यांचा छतभर पसरलेला पसारा.
पहिली काही मिनिटे नजर भिरभिरत होती आमची.
'हे पुस्तक नक्की वाच तू.'
कॅनव्हास नावाचं एक जाडजूड पुस्तक आभाताईंनी आर्याच्या हातात दिलं.
तुला पाश्चात्य कलाकारांची चांगली ओळख होईल यातून.
चित्रकलेत 'वाचन' वगैरेही असतं होय?
मला आपलं 'काढणंच' माहीत होतं. (माझं स्वगत चालू झालं.)
नंतर लगेच स्वतःच्या (ओरिजिनल) चित्रांची एक फाईलच त्यांनी आर्याला दिली.
सुंदरच होती चित्रं.
चित्रं पाहताना आर्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्यमिश्रित आनंदाचे भाव स्पष्ट दिसले मला.
'ताई मग आर्याने रोज कोणती चित्रं काढली पाहिजेत?'
माझा आपला पठडीतला प्रश्न.
'आर्या तुला कोणते चित्रकार माहितीएत?'
'त्यांची चित्रं पाहिली आहेस का तू नेटवर?'
माझ्या प्रश्नाकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष.
व्हॅन गॉच्या, पिकासो, मोने, शेरगिल, बेंद्रे यांच्यापासून सुरुवात कर.
भरपूर चित्रं 'पाहा' यांची.
'बरं बरं. पण तिनं काय काढलं पाहिजे?'
माझं टुमणं सुरूच.
'तुमच्याकडे पेन ड्राइव्ह आहे का हो?'
'आँ ? नाही, का हो ताई?'
'यातील काही चित्रकारांवर सुंदर फिल्म्स आहेत.
त्या तिला दिल्या असत्या.
त्या पण बघ आर्या.
एखाद्या कलाकाराचं आयुष्य कसं असतं हे समजेल तुला त्यातून.
काही यंगस्टर आर्टिस्ट वरच्या फिल्म्स आहेत त्या पण देईन, नक्की 'बघ'.
तिने एलिमेंटरीची परीक्षा दिलीये ताई - मी
'माझा नाही हो या परीक्षांवर फार विश्वास.
या परीक्षांमुळे फारच चाकोरीबद्ध चित्रं काढायला लागतात मुलं.
नवीन विचार सुचणंच बंद होतं त्यांचं.'
'हं..... बरं मग काय काढू देत हिला?
विशिष्ट प्रकारची चित्रं काढू देत की वेगवेगळे प्रकार हाताळू देत?'
मी परत माझ्या समेवर.
'ऐक ना आर्या, तू एक दोन महिन्यातून ये पुण्यात.
काही चित्रकार माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत.
आपण त्यांना भेटायला जाऊ.
त्यांचा स्टुडिओ पाहू.
त्यांना प्रत्यक्ष काम करताना बघू.
त्यांच्याशी गप्पा मारू.
त्यांच्याशी गप्पा मारू.
मजा येईल तुला.
मोठया कॅनव्हासवरची चित्रं बघताना भारी वाटतं एकदम.'
(माझ्या प्रश्नाला परत एकदा व्यवस्थित फाटा....)
वाह! छान कल्पना ताई!
पण तिने काय 'काढावं?'
(मी ही काही कमी चिवट नाही.)
'काढेल हो ती.
ऐका ना, तिला एकदा अभिनव कला विद्यालय दाखवायला घेऊन जा.
कला महाविद्यालयातील वातावरण पाहू देत जरा तिला. तिथली लायब्ररी दाखवा.
कधीतरी जे. जे. आर्ट स्कूल दाखवा.
आणि हो कोचीला घेऊन जाणार का तिला?'
'आं..कोची? का?
तिकडे काय असतं आता?'
'तिकडे कला महोत्सव असतो. बिनाले या नावाचा.
शहरभर कला पसरलेली असते त्या दिवसांत.
सुंदर अनुभव असतो.
कधीतरी दाखवा तिला तो पण.'
बाई काही जाम माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाहीत.
'तुमच्या शाळेच्या ग्रंथालयात पासवर्ड मासिक येतं का हो?'
'नाही.'
'चकमक?'
'नाही.'
'आर्या तू घेऊन टाक या मासिकांची मेंंबरशिप.'
'नाही नाही, घेतो ना मी ग्रंथालयासाठी.'
स्वाभिमान दुखावला गेलेल्या माझी केविलवाणी धडपड.
'आर्या तू व्हॅन गॉच्या चित्रांची कॉपी करायला हरकत नाही.'
'काय ???'मी तीन ताड उडालो.
मघापासून मी विचारत असलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या देत होत्या.
पण हे...... हे.....असं.....
गॉगच्या चित्रांची कॉपी?
परत एकदा माझ्या कायिक अभिनयाकडे पूर्ण दुर्लक्ष करून आभाताई दुसऱ्या खोलीत गेल्या.
येताना अक्षरनंदनच्या मुलांची काही चित्रं घेऊन आल्या.
येताना अक्षरनंदनच्या मुलांची काही चित्रं घेऊन आल्या.
'हा बघा एक वेगळा प्रकार.'
प्रत्येक कागदावर 'कुणीतरी' काढलेल्या एका चित्राचा छोटासा तुकडा चिकटवला होता.
आणि त्याच्या आजूबाजूला चित्रं काढत मुलांनी त्याला आपल्या चित्रात सामावून घेतला होता.
'वाह! छानच कल्पना आहे ताई!'
फारच सुंदर दिसत होती चित्रं.
अपुरी गोष्ट पूर्ण करा हे माहीत होतं.
हे काहीसं असंच वाटलं मला.
'शिवराजदादा हे चित्रांचे तुकडे व्हॅन गॉच्या चित्रांचे आहेत बरं.'
'काय ???' मी परत एकदा उंच आकाशात.
आभाताई पक्क्या 'वेड्या' आहेत यावर मी शिक्कामोर्तब करून टाकलं.
मग अक्षरनंदनमध्ये त्या करत असलेल्या प्रयोगांबद्दल चर्चा सुरू झाली.
खूप प्रयोग केलेत त्यांनी या शाळेत.
'ताई तुम्ही आठवड्यातून अशा दोन कृती आर्याला सांगाल का?'
'हो, छान कल्पना आहे.
नक्की सांगेन.'
म्हणजे सहा महिन्यात असे चाळीस पन्नास तरी प्रकार काढून होतील तिचे - मी.
आर्या तू गोष्टी वाचून इलस्ट्रेशन्सही करायला हरकत नाही. - आभाताई
अरे खरंच की, हे तुला जमायला लागलं की छात्र प्रबोधन मासिकासाठीही काही काम करता येईल.- मी
मला बोलता बोलता आणिक एक सुचलंं - 'आर्या रोजची डायरी लिहायला
लाग.
केवळ चित्रकलेशी संबंधितच
लिही.
तू रोज केलेले काम, केलेले
वाचन, हे सगळ करत असताना तुझ्या मनात आलेले विचार, भावना, पडलेले प्रश्न सर्व
उतरव डायरीत.
पण सर्वाना वाचायला खुली
राहू दे तुझी डायरी.'
'पण दादा, तुमची ही कल्पना युनिक आहे बरं का!
असा विचार होत नाही आपल्याकडे फारसा.
रोज आर्याला शाळेच्या वेळेतच दोन तीन तास चित्रकलेसाठी द्यायचे...
आणि वर्षाच्या शेवटी स्वतःच्या चित्रांचंं तिने प्रदर्शन भरवायचं.
वा! खरंच मस्तच कल्पना.
आम्हालाही हे सुख नाही मिळालं.
आपण मिळून करू काहीतरी भारी आर्यासाठी.
आम्हालाही हे सुख नाही मिळालं.
आपण मिळून करू काहीतरी भारी आर्यासाठी.
आर्या एक गोष्ट लक्षात ठेव,
कला-अभिव्यक्ती ही आतून बाहेर यायला हवी.
नुसते कागद, भिंती सुंदर करणंं हा हेतू नसावा कलेचा.
नुसते कागद, भिंती सुंदर करणंं हा हेतू नसावा कलेचा.
नाहीतर कलाकृती उथळ राहतात.
परीक्षेत ग्रेड मिळवण्यासाठी शिकलेल्या कलाकृतीत याला जागा नसते....'
आभाताईंनी एक प्रकारे आर्याचं 'पालकत्वच' स्वीकारल्यासारखं वाटलं मला.
मी एकदम निश्चिन्त झालो.

मला चित्रकलेतील काही म्हणजे काही येत नाही.
त्रिकोणी डोंगर आणि त्यांच्यामागून उगवणारा सूर्य... एवढीच माझी चित्रकलेतील काय ती पहुँच!
पण पोरांमधले विशेष गुण जाणवतात लगेच.
पण पोरांमधले विशेष गुण जाणवतात लगेच.
असो.
सुमारे तासभर होतो आम्ही आभाताईंकडे.
पण खरंच खूपच समृद्ध करणारा हा तास होता.
या तासाभरात मला चित्रकलेतील खूप काही समजायला लागलंय असं 'उगीचच' वाटायला लागलं.
चित्रकलेबाबतची पुस्तकं....
चित्रकारांवरच्या फिल्म्स....
भारतीय चित्रकार....
पाश्चात्य चित्रकार ....
जे. जे. स्कूल ....
बिनाले ....
आणि बरंच काही .....
------------------------------ -----------
आभाताईंच्या घरातून बाहेर पडल्या पडल्या मी आमच्या तिघांचा एक whatsapp group तयार केला .
नाव दिलं 'रंगरंगीले'!
------------------------------ -----------
२२ तारखेनंतर मध्ये बराच
काळ गेला.
आणखी एक मुलगा आधीपासून
डोळ्यांसमोर होताच.
साहिल लोहार.
योगायोगाने आर्याच्याच ८ वी
क मधील वर्गातला.
छान चित्रे काढतो.
दर १०-१२दिवसांनी नवीन
काहीतरी असतंंच त्याच्याकडंं दाखवायला.
त्याच्याही पालकांशी बोललो.
पालकांना व साहिललाही
कल्पना आवडली.
‘चालेल. करूयात.’ म्हणाले.
चलो एक से भले दो...
शेवटी अध्यापकांचे काम ते
काय असते अहो?
समोरच्या अधिकाधिक खरंं तर प्रत्येक विद्यार्थ्यात असलेलं 'काहीतरी' शोधणंं आणि
ते शोधलेलं (उंच) ‘कुठेतरी’ नेऊन ठेवायचा प्रयत्न करणं.
ते शोधलेलं (उंच) ‘कुठेतरी’ नेऊन ठेवायचा प्रयत्न करणं.
बरोबर ना?
..............................................................
आर्याची, साहिलची चित्रकलेत किती प्रगती होईल माहीत नाही.
पण पुढचे सहा महिने ते आणि त्यांच्यासोबत कदाचित मी ही चित्रकला 'जगेन' हे नक्की.
....................................................
आर्याच्या व साहिलच्या काही कलाकृती
पण पुढचे सहा महिने ते आणि त्यांच्यासोबत कदाचित मी ही चित्रकला 'जगेन' हे नक्की.
....................................................
आज पाडवा !
अस्मादिकांचा तिथीनुसार
वाढदिवस !!
म्हणून ब्लॉग पोस्ट करण्याचा मुहूर्त आजचा!!!
म्हणून ब्लॉग पोस्ट करण्याचा मुहूर्त आजचा!!!
.........................................................................
शिवराज पिंपुडे
शिक्षण समन्वयक
ज्ञान प्रबोधिनी, निगडी
केंद्र
९४२३२३९६९५, ८८८८४३१८६८
Wa wa.....Khoopach chan....
ReplyDeleteमस्त.....
ReplyDeleteखूपच छान लेख .. प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला .. आभाताई आहेतच gr8 !👍 आता या दोघांनाही छान दिशा मिळाली याचा विशेष आनंद !!
ReplyDeleteयोगायोगाने हे दोघे शिशुवर्गातील माझे विद्यार्थी आहेत साहिल प्रत्येक नवीन केलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी अजून ही मला दाखवायला येतो.. आर्या आणि साहिल दोघाना खूप शुभेच्छा !!
आणि शिवराज दादा ---
*मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर*
*लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया*
असंच तुझ्याही बाबतीत होवो असेच हिरे तुला सापडो आणि तू त्यांना पैलू पाडून घडवशील अशी खात्री आहे या उपक्रमासाठी खूप सदिच्छा !!
Convergent ani divergent vyaktincha sanvad ahe as vatala.... Mst.....
ReplyDeleteConvergent ani divergent vyaktincha sanvad ahe as vatala.... Mst.....
ReplyDeleteमस्तच दादा.
ReplyDeleteवा मस्त खूपच छान.
ReplyDeleteफारच छान..!!
ReplyDeleteफारच छान
ReplyDeleteवेड लागणे आणि वेड लावणे ह्यांचे नेमके अर्थ या blog मधील व्यक्तींचा संपर्क आल्यावर खऱ्या अर्थाने स्पष्ट होतात... शुभेच्छा
ReplyDeleteखूपच छान शिवराज दादा, तुमच्या ब्लॉग ब्रश मधून निर्माण झालेले हे चित्र अगदी डोळयांसमोर उभे राहिले.
ReplyDeleteमाझ्यासारख्या चित्रकला या विषयाकडे दुर्लक्ष करणाऱ्या, शाळेमध्ये सतत १० वर्षे निसर्गचित्र म्हणून, सूर्य डोंगर नदी घर काढणाऱ्यालाही, काही नवीन खाद्य मिळाले, नवा दृष्टिकोन मिळाला. काही नवीन गोष्टी कळल्या.
धन्यवाद, लिहीत रहा.
भाग्यवान आहे आर्या.. मनापासून शुभेच्छा.!
ReplyDeleteआम्ही तिथेच गप्पा ऐकत आहोत असे वाटले , पेरणी खूप छान चालू आहे .
ReplyDeleteआभा ताई व डॉ. Vidula गोफ कला विज्ञानाचा कार्यशाळा घेतात अपल्या करूयात
ReplyDeleteआर्या आणि साहिल दोघंही उत्तम चित्रकार व्हावेत यासाठी तुमची तळमळ दिसून आली. दोघांची चित्रही खुपच सुंदर आहे. तुमचे 'शब्दचित्र' तर नेहमी प्रमाणे डोळ्यासमोर चित्र नव्हे तर चलचित्र च उभं राहतंय...
ReplyDeleteअतिशय वस्तुनिष्ठ तरीही भावणारे. असे करून बघितलेच पाहिजे असे काही . उशिरा वाचलं पण छान ताजं वाटलं.
ReplyDelete