#एक मुक्त दिवस...
एक मुक्त दिवस...
7 वी क चा राखी विक्रीत तर 6 वी क चा स्वच्छ सुंदर वर्ग स्पर्धेत प्रथम क्रमांक आला.
काय बक्षीस द्यावं असा विचार सुरू होता.
कुठली तरी फ्रेम, क्रीडा साहित्य असं काही तरी देण्याची प्रथा होती आजवरची.
काही वेगळं बक्षीस देता येईल का ...विचारचक्र सुरू होतं.
एक मस्त कल्पना सुचली.
मुलांना एक दिवस मुक्त दिवस म्हणून देता आला तर?
मुक्त म्हणजे सर्व प्रकारच्या वेळापत्रकाच्या बंधनातून सुटका.
स्वतःचं वेळापत्रक स्वतःच ठरवायचं.
दिवसभर खेळावंस वाटलं तर खेळायचं, वाचावंसं वाटलं तर वाचायचं, कट्ट्यावर बसून गप्पा माराव्याश्या वाटल्या गप्पा मारायच्या आणि हो दिवसभर अभ्यास करावासा वाटला तर अभ्यासही करायचा.
किंवा यातलं काहीही कॉम्बिनेशन चालेल.
भूक लागली की डबा खायचा, सुटी होण्याची वाट नाही पहायची.
मी मुक्त दिवस म्हणजे काय हे स्पष्ट करत होतो आणि मुले डोळे विस्फारून पाहत होती.
त्यांचा त्यांच्या कानांवर विश्वास बसत नव्हता.
माझं बोलणं झाल्यावर उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट झाला, थोडा आरडाओरडाही झाला.
खरं तर दुसऱ्या सत्रात मुक्त दिवस देण्याचा विचार होता.
पण मुलांनी इतकं डोकं उठवलं की याच सत्रात मुक्त दिवस देण्याचं ठरलं.
वार होता शनिवारचा.
आदल्या दिवशी मुलांना कल्पना दिली....उद्या दप्तर आणा पण त्यात काय भरायचं हे तुम्ही ठरवा.
हवं ते करा पण बाकी शाळा सुरू आहे याचेही भान ठेवा.
उद्याचादिवस मस्त मजेत, मनासारखा घालवा.
लगेच मुलांचे प्रश्न सुरू झाले.
‘शाळेच्या ड्रेसवर नीट खेळता नाही येणार. दलाचा गणवेश घालू का?’
‘चालेल.’
‘सायकल चालवली तर चालेल का?’ थोडा अनपेक्षित प्रश्न.
‘चालेल.’
‘आणि क्रिकेट?’
‘नाही. मुक्त दिवस म्हणजे शाळेचे नियम मोडणे नव्हे.’
मला व मुलांनाही मुक्त दिवस हळूहळू स्पष्ट होत होता.
संध्याकाळी अन्य विभागातील लोकांना आमच्या योजनेची कल्पना दिली.
आमचे सुमारे 100 विद्यार्थी उद्या बागडताना दितील. कृपया चौकशी करू नये.
आता सर्वांनाच प्रतीक्षा उद्याच्या दिवसाची होती....
शनिवारचा 'तो' दिवस उजाडला.
शनिवारी आमची शाळा सकाळची असते.
7 ते 11.15
सकाळी उपासना, असला तर एखादा छोटा कार्यक्रम शेवटी सर्व मुलांशी माझा संवाद असा क्रम 7 ते 8 मध्ये असतो.
म्हणजे मुक्त म्हणून मुलांना 3 तास मिळणार होते.
त्या दिवशी ठीक 8 ला सर्व संपेल अशी काळजी घेतली.
मुक्त दिवस सुरू झाला होता.
पुढच्याच मिनिटाला मला दोन धक्के बसले.
मुलींच्या एका छोट्या गटाने मागणी केली, ‘दादा आम्हाला गच्चीवरची बाग पहायची आहे.’
तर दुसऱ्या एका गटाला जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा पहायची होती.
दोन्ही गटांची व्यवस्था लावली.
ही इच्छा या मुलींना आधीपासून होती की मुक्त दिनाचे या काही नियोजन करून आल्या होत्या...मला प्रश्न पडला.
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ७ वीत जाईपर्यंतही मुलांना शाळेचे सर्व विभाग दाखवण्याची आमची काहीच व्यवस्था नव्हती का???
बहुतांश गट अपेक्षेप्रमाणे मैदानावर खेळायला गेला.
2,3 मुले सायकलवरून फेऱ्या मारायला लागले.
एक गट मातृमंदिरात हस्तकलेचे काही काम करायला लागला.
काही जण निवांत बसून होते.
11 वाजता सर्वांनी एकत्र यायचे ठरले होते.
त्याप्रमाणे मातृमंदिरात सर्व जण जमलो.
खेळ, गप्पा, सायकलिंग, हस्तकला याशिवाय काही मुलांनी चित्रे काढली होती,
संगणकाचे प्रॅक्टिकल पूर्ण केले होते,
चक्क अभ्यासही केला होता.
एका गटाने तर स्वच्छताही केली होती.
एकाने बासरी वाजवली होती.
एकंदर मुले खूष होती.
‘कसं वाटलं?’ माझा प्रश्न.
‘आजचा दिवस कधी संपूच नये आणि हा दिवस दररोज यावा...’
‘शनिवारी मुक्त दिवस देण्याऐवजी इतर वारी द्यायला हवा होता म्हणजे खूप वेळ मिळाला असता...’ ही मला एकदम अपेक्षित प्रतिक्रिया.
‘राखीविक्री पासून कालपर्यंत फक्त अभ्यास, प्रोजेक्ट,गणेशोत्सव आणि लेझीम प्रॅक्टिस यातच सगळे दिवस गेले खेळायला वेळच मिळाला नाही त्या सगळ्याची कसर काल आम्ही भरून काढली...’
‘अशा प्रकारचे नवीन बक्षीस मिळाल्याचा खूप आनंद झाला व खूप मज्जा आली...’
‘खरं तर शाळेत तुम्हाला हवे ते करा ही कन्सेप्टच मुलांना सुखावून गेली. आदल्या दिवापासून नियोजन करा असे सांगितल्यामुळे एखाद्या उपक्रमाचे नियोजन करायचे असते मग सगळे व्यवस्थित पार पडते ही शिकवण ही त्यांना मिळाली...’ एका पालकांनी आवर्जून त्यांचा प्रतिसाद पाठवला.
खरंच शाळा चालवताना, आपण खूप गोष्टी गृहीत धरतो.
हे मुलांना आवडेल,
हे केलं की मुलांचा असा विकास होईल,
ही गोष्ट मुलांना याच प्रमाणात दिली पाहिजे.....
पण मुलांच्या मनात डोकावण्याचा फारसा प्रयत्न होत नाही.
त्यांना काय हवंय?
त्यांना नक्की आवडलंय का?
त्यांच्या काही कल्पना आहेत का?
असा विचार खूप कमी होतो.
वर्षातून 3/4 वेळा असा मुक्त दिवस देता येईल का?
त्या वेळी मुले काय काय करतात याचे निरीक्षण करून काही निष्कर्ष काढता येतील का?
जसे की खेळ सोडून मुले ज्या अन्य गोष्टी करतील ते छंद म्हणूंन जोपासा असे म्हणता येईल का?
ज्या गोष्टी त्यांनी शाळेत केल्या त्या घरी का नाही केल्या?
घरी वेळ होत नाही का?
पालकांचा पाठिंबा नसतो का?
असा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करता येईल.
तुम्हाला काय वाटते?
जोपर्यंत एखादी गोष्ट करण्याची/शिकण्याची स्वतःच्या मनात इच्छा निर्माण होत नाही तोपर्यंत शिक्षण सुरूच होत नाही, हे आपल्याला पटते ना?
शिवराज
Nice plan Dada
ReplyDeleteमस्तच... मुक्त दिवसाच्या निमित्ताने मुलांना अभ्यासता आले... असा मुक्त दिवस ठरवून द्यावा जेणेकरुन मुले खूप तयारीत येतील.
ReplyDeleteअध्यापक यांच्यासाठी देखील अशी काही व्यवस्था करता येईल का?
This comment has been removed by the author.
ReplyDeleteमस्तच दादा, मुलांना काय आम्हाला सुद्धा खूपच आवडले.
ReplyDeleteछान कल्पना आहे
पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्या.
Chan upakram
ReplyDeleteChan upakram
ReplyDeleteKhup sunder Kalpana 👏👏👏👏....stutya upakram 👌👌👌Self learning ha part sadhya kami zala aahe ani khara tar Jyachi nitanta garaj aahe...tyamule Ashya prakarche upakram nakkich upayukta aahet. Keep it up.
ReplyDeleteShivraj dada Swatahatli creativity ashich jap Ani vadhav. All d best👍👍
खूपच छान कल्पक बक्षिस आणि आम्हालाही असा दिवस मिळावा असं वाटलं
ReplyDeleteखुप छान बक्षिस . out of Box विचार . हे करत असताना शाळेचे नियम मोडणार नाहीत याची दक्षता व मुलांना आधीच विश्वासात घेऊन सांगितले . त्यामुळे मुलांना स्वातंत्र्य व स्वैराचार यातील फरक नक्कीच कळाला असेल .
Deleteजोपर्यंत एखादी गोष्ट करण्याची/शिकण्याची स्वतःच्या मनात इच्छा निर्माण होत नाही तोपर्यंत शिक्षण सुरूच होत नाही, हे मात्र खरं आहे दादा
Deleteखुपच छान उपक्रम
This comment has been removed by the author.
ReplyDeleteसर्वप्रथम आपल्यातील प्रयोगशील शिक्षकाला वंदन
ReplyDeleteपुढील मुद्यांचा विचार आला -
1. आपल्यावर कोणाचे नियंत्रण / बंधन नाही या विचाराने मुले कशी react करतात त्यानुसार मुलांचे गट तयार करता येतील त्यासाठी निरीक्षण करण्यासाठी अधिक शिक्षकांची मदत घेउन पालकांचे समुपदेशन मुलांना न कळता घेता येईल .
2. मुक्त दिवसाचे आदल्या दिवशी मुलांचे कृती संदर्भात काय विचार आहेत याची चाचपणी करून नकळत दिशा देउ शकतो
3. उपक्रम जास्त वेळ घ्यायचा असेल तर या उपक्रमाचा objective उद्देश व त्यातून काय outcome परिणाम साधायचा याची पालकांशी चर्चा करता येईल .
4. या उपक्रमाला समांतर 'दप्तर मुक्त दिवस ' घेता येईल काय ?
अशा प्रयोगातून हसत खेळत , ज्ञानरचनावादी शिक्षणाचा आनंद घेता - देता येईल.
- सतीश पवार
Concept is to know your inner liking ....And this is what we should follow in life
ReplyDeleteK
ReplyDeleteखूप छान दादा तुमच्या कल्पना नेहमी च वेगवेगळ्या असतात. मुलांना अविस्मरणीय अनुभव देणार्या .
ReplyDeleteFarach chan.... Gurukulche divas athavle.... Kharach khup shikayla milata asha jababdaritun... Ani mulanna tr nkki abhyasta yeu shakt... Match....
ReplyDeleteFarach chan.... Gurukulche divas athavle.... Kharach khup shikayla milata asha jababdaritun... Ani mulanna tr nkki abhyasta yeu shakt... Match....
ReplyDeleteFarach Chan. Satish Dada yancha matashi sahmat . Objective n observation checklist madhun mulancha Navin gun kiwa interest nakki kaltil, aase watete.
ReplyDeleteफारच छान पालकांना समाउन घेतल्यास मुलांना छान घडविता येईल असे वाटते
ReplyDeleteअतिशय सुंदर संकल्पना, मुलांनी त्याचा खुप सुंदर पद्धतीने उपयोग केला.
ReplyDeleteKhupach chan
ReplyDeleteतू भारी अ आहेसच.. आणि ही मुलं सुद्धा😂
ReplyDeleteखूप च सुंदर
ReplyDeleteखूप च सुंदर
ReplyDelete