#करोनाच्या नजरकैदेत...भाग - ३
करोनाच्या नजरकैदेत...भाग - ३
सकाळी सकाळी फाटक बाईंचा (मानसीताईंचा) फोन, "अहो ब्लॉग वाचला तुमचा. बरंच कौतुक केलंय की आमचं. ते ठीकए ओ सगळं. पण थीमनुसार कथा शोधा. एका कथेसाठी आधी दहा गोष्टी वाचा. मग सराव करा. संगीत शोधा. मग घरातून एका खोलीत quarantine व्हा. घरच्यांना कसलाच आवाज न करण्याची तंबी द्या. चुकलं की पुन्हा रेकॉर्ड करा... बाईंची बडबड सुरू होती.
"वाचणार आहात ना एकाआड एक दिवस कथा?"
कपाळाला आठ्या पाडून माझा प्रश्न.
"होय ओ. सांगतीये फक्त."
माझा सुटकेचा निःश्वास.
पण फोन ठेवता ठेवता ठेवता मानसीताईंनी एक प्रश्न विचारला, "काय ओ तुमचा एखादा तास झाला की नाही तुमच्या त्या झूमबिमवर?" प्रश्नातील खोच लगेच लक्षात आली माझ्या.
"हं ठेवा फोन."
तोंड वाकडे करून फोन ठेवून दिला मी.
पण खरंच मी स्वतः अद्याप एकही तास सहावी किंवा सातवीसाठी घेतला नव्हता.
अगदीच खरं होतं त्यांचं म्हणणं.
इगो दुखावला की राव.
लगेच विषय ठरवून टाकला.
मौनसंवाद.
दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून स्वतःच्याच मनाशी विचार करण्याचं तंत्र.
खरं तर दरवर्षी गणेशोत्सवात हा विषय आम्ही घेतो.
पण या वर्षी पुराच्या आपत्तीमुळे गणेशोत्सव मर्यादित स्वरूपात झाला.
आणि हा उपक्रम राहून गेला.
आता ही चांगली संधी आहे असं वाटलं.
छोटं ppt पण तयार केलं.
संवादाची वेळ जाहीर केली.
४० पेक्षा अधिक विद्यार्थी हजर होते तासाला.
मला स्वतःलाच छान वाटलं बोलून.
तासाच्या शेवटी तीन विषय दिले मुलांना-
दप्तर, घड्याळ व आरसा.
संध्याकाळपर्यंत मुलांनी यातील एका विषयाशी तद्रूप होण्याचा चांगलाच प्रयत्न केला की.
नमुनेदाखल काही संवाद -

ऋतुजा - काय रे दप्तरा, सध्या घरात बसून बसून कंटाळा येत असेल ना तुला?
दप्तर - नाही ग. सध्या मी खूप खुश आहे. तुझी ती पन्नास पुस्तकं उचलण्यापासून सुटका मिळाली आहे ना.
ऋतुजा - अहो दप्तर शेठ, मी ती पुस्तकं तुम्हाला फक्त धरायला देते. नंतर तुम्ही माझ्याच पाठीवर स्वार होता की...

..........
ज्ञानेश्वरी - तुला आनंद आणि दुःख केव्हा होते रे?
आरसा - जेव्हा लोक माझ्यात पाहून छान छान तयार होतात. त्यांचं छान छान रूप पाहतात तेव्हा मला आनंद होतो. आणि जेव्हा माझ्या शरीराचे तुकडे करतात, म्हणजे त्या दुखापतीचा त्रास होत नाही मला. पण माझ्या शरीराचे तुकडे कुणाला लागून त्यांना इजा झाली तर मात्र मला दुःख होते.

ओजस्वी - काय रे दिवसभर हात हलवून कंटाळा येत असेल ना तुला?
घड्याळ - कंटाळा? अगं माझे हात खूप ठणकायला लागतात. पण विश्रांती घेईल तर वेळेचा साक्षीदार ठरेल का मी?
ओजस्वी - हं खरं आहे.
घड्याळ - पण तुला एक गंमत सांगू का? सगळीकडे एकच एक वेळ नसते.
ओजस्वी - काय? हे कसं काय?
घड्याळ - तुझा भूगोलाचा अभ्यास राहिलाय वाटतं. कर तो आधी. म्हणजे समजेल तुला.

...........
दोन दिवसांनी आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींंशी किंवा नातलगांशी मौनसंवाद करण्यास सुचवले.
याहीवेळी मुलांनी छान प्रयत्न केला.
याहीवेळी मुलांनी छान प्रयत्न केला.
आता आणखी दोन दिवसांनी शिवाजी महाराजांशी मौनसंवाद करण्यास सुचवायचे मनात आहे.
म्हणजे निर्जीव वस्तू, हयात असणाऱ्या व्यक्ती, हयात नसणाऱ्या व्यक्ती अशा सर्व प्रकारांचा मुलांना परिचय होऊ शकेल.
.........................
.........................
परवा सकाळी सकाळी एक मस्त कल्पना सुचली. (भा डी पा मधील अनी सारखं करतोय का मी...भन्नाट कल्पना...युनिक कल्पना...अशी कल्पना जी कुणालाच सुचली नसेल...)
आत्तापर्यंत ज्या कृती दिल्या होत्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एकट्याने करायच्या होत्या.
पण अशी एखादी कृती देता येईल का की ज्यात सगळ्या घरच्यांचा सहभाग असू शकेल...
शाळेमध्ये नाट्याच्या तासाला कधी कधी हजेरी लावत असतो मी.
तेव्हा मयुरीताई काय काय घेत असतात असं आठवत होतो.
आणि त्यावरूनच सुचली ही कल्पना.
समजा घरातील सगळ्यांना सहभागी करून एखादी जाहिरात तयार करून त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग मुलांना पाठवायला सांगितलं तर?
लगेच आमच्या ग्रुपवरती मयुरीताईंना विचारलं.
त्यांचाही नेहमीप्रमाणे उत्साही प्रतिसाद आला.
दुपारपर्यंत एक छोटी नियमावलीच तयार केली त्यांनी.

आज कुछ नया करते हैं...
या शीर्षकाखाली हा उपक्रम स्पष्ट करण्यात आला...
'मुलांनो, आजवर नाट्याच्या तासाला आपण आपल्या मित्र मैत्रिणींंच्या गटात जाहीरात तयार केली आहेच. आताही आपण तसंंच करणार आहोत. पण यावेळी आपला गट म्हणजे आपलं कुटुंब असणार आहे.'
असं म्हणून या खेळाचे सर्व नियम मयुरीताईंनी स्पष्ट केले.
आणि शेवटी लिहिलं,
तुमच्या कल्पक जाहिरातींच्या प्रतीक्षेत,
मयुरीताई व मानसीताई

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी या उपक्रमाची घोषणा केली.
सहावीच्या मुलांनी हा उपक्रम जोरदार उचलून धरला.
सहावीच्या मुलांनी हा उपक्रम जोरदार उचलून धरला.
तब्बल ३६ जाहिराती आल्या की.
सातवीने मात्र या उपक्रमाकडे साफ पाठ फिरवली.
नगण्य प्रतिसाद.
मग एक दिवस वाढवून दिला त्यांना.
त्यानंतर मात्र काही मोजके पण भन्नाट प्रतिसाद आले.
मग एक दिवस वाढवून दिला त्यांना.
त्यानंतर मात्र काही मोजके पण भन्नाट प्रतिसाद आले.
काही काही जाहिरातींमध्ये आजी आजोबा, घरातील छोटी दोस्त मंडळीही उत्साहानं सहभागी झाली.
अर्थातच सर्व जाहिराती ऐकून त्यांना प्रतिसाद द्यायला मयुरीताई विसरल्या नाहीत.
ऐकुयात काही नमुने...
(इयत्ता सातवीतील विस्मया व स्वरा तर इयत्ता सहावीतील प्राप्ती व अत्रेय यांच्या.)
अर्थातच सर्व जाहिराती ऐकून त्यांना प्रतिसाद द्यायला मयुरीताई विसरल्या नाहीत.
ऐकुयात काही नमुने...
(इयत्ता सातवीतील विस्मया व स्वरा तर इयत्ता सहावीतील प्राप्ती व अत्रेय यांच्या.)
एकुणात काय मजा आली.
शिवराज पिंपुडे
ज्ञान प्रबोधिनी, निगडी
Khup sundar
ReplyDeleteखुप छान,अभिनंदन 💐
ReplyDeleteभारीच मौनसंवाद! जाहिराती सुद्धा उत्तम! दादा 'लॉक डाऊन' असे पर्यंत 'पेन डाऊन' करु नका😊
ReplyDeleteMast🤭👌👌👌👌
Deleteखुप छान,अभ अभिनंदन दादा
ReplyDeleteमस्तच. जाहिरात सादरीकरण आमचं पण चालु आहे दादा लवकरच आपल्याला पाठवू. लिखाण छानच...
ReplyDeleteशंतनु रबडे
मस्तच...
ReplyDeleteअसेच खूप नवे नवे उपक्रम करत रहा.
मस्त लेखन !!लॉक डाऊन च्या काळातही मुलांना मोकळे पणाने करायला लावणाऱ्या अनेक कल्पक कृती
ReplyDeleteमस्त लेखन !!लॉक डाऊन च्या काळातही मुलांना मोकळे पणाने करायला लावणाऱ्या अनेक कल्पक कृती
ReplyDeleteमस्त लेखन !!लॉक डाऊन च्या काळातही मुलांना मोकळे पणाने करायला लावणाऱ्या अनेक कल्पक कृती
ReplyDeleteवा छानच
ReplyDeleteवा छानच जाहिरात 👍👍
Deleteखूपच मस्त ! मुलांना घरी बसून करायला लावणार्या या कृती उत्तमच.
ReplyDeleteभारीच मौनसंवाद! जाहिराती सुद्धा उत्तम!
ReplyDeleteWah dada good going
ReplyDelete