#करोनाच्या नजरकैदेत... भाग ७.१
करोनाच्या नजरकैदेत... भाग ७.१
लॉक डाऊन २.० सुरू झालं आणि त्या सोबत आमच्या उपक्रमांचाही दुसरा टप्पा सुरू झाला.
त्यामुळे अर्थातच या दुसऱ्या टप्प्यात काही उपक्रम आम्ही कमी केले.
तर काही नव्यानंं सुरू केले.
पण या टप्प्यासाठी काही थीम ठरवता येईल का असा विचार करत होतो.
आणि अचानक आमच्या शाळेतील गुरुकुल विभागात शाळेचे केंद्रप्रमुख मा. वामनराव अभ्यंकर तथा भाऊ श्रावण महिन्यात घेत असलेल्या व्रतांची आठवण झाली.
मला आठवलेली तीन-चार व्रते मी अध्यापकांना सांगितली.
मग त्यांनीही त्यात छान भर घातली.
६-७ व्रतांंची निश्चिती झाली.
पुढची सुचतील या भरवशावर थीम ठरवून टाकली.
व्रत पालन.
मुलांना दिलेले व्रत व त्याचे पालन केल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या अनुभवाचा काही भाग याआधारे हा ब्लॉग पुढे पुढे सरकेल.
....................
पहिल्या दिवशी ग्रुपवर सूचना पोस्ट झाली.
मित्रांनो आजपासून आपण एक नवीन गोष्ट सुरु करत आहोत. रोज तुम्हाला एक व्रत देण्यात येईल. ते तुम्ही अत्यंत कसोशीनंं व प्रामाणिकपणे पाळायचं आहे...
व्रत क्र. १
आज दहा ते पाच या वेळेत पूर्ण मौन पाळून या उपक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. एक अक्षरही बोलायचं नाही. शक्यतो खाणाखुणा, लिहून देणंंही नकोच. मग पाळणार ना मौनव्रत...
(सातवीच्या मुलांनी गेल्या वर्षी शाळेत असताना हा अनुभव एकदा घेतला होता. सहावीच्या मुलांसाठी मात्र हा पूर्णपणे नवीन अनुभव होता.)
संध्याकाळी मुलांचे प्रतिसाद आले -
सारखं घड्याळकडंं लक्ष जात होतं. कधी एकदा पाच वाजतात असं झालं होतं.
मौन पाळण्याचा प्रयत्न केला. पण दिवसभरात एकूण २७ वेळा बोललंं गेलंं. आईनंं मोजण्याचंं काम अचूक केलंं.
बोलण्यावाचून किती अडू शकतं हे आज समजलं.
आज मौन पाळल्यामुळंं माझा जेवणाचा वेळ अगदी निम्म्यावर आला.
शाळेत मौन पाळलंं तेव्हा आम्ही सगळीच मुले शांत होतो. त्यामुळे फार वेगळंं वाटल नाही. पण आज घरचे सगळे बोलणार आणि फक्त मीच शांत त्यामुळे खूपदा बोलायचा मोह झाला.
आज घरात कोणासोबतच शाब्दिक चकमक उडाली नाही.
दादा आज मी कुमार कथांमधील ७-८ गोष्टींचा फडशा पाडला.
माझ्यासोबत माझ्या आईनंंही व्रत पाळलंं.
बाबांनी वरदला (माझ्या छोट्या भावाला) सांगितलंं की, तू आज दादाला काहीही चीडवू शकतोस. त्याचंं मौनव्रत आहे. त्यामुळे तो तुला काहीही बोलणार नाही.
आज न बोलता येणाऱ्यांचे त्रास समजले.
आज खूपच पटपट कामंं उरकता आली.

...
व्रत क्र. २
मुला-मुलींनो आज सकाळी उठल्यापासून ते दुपारी ४ पर्यंत तुम्ही जी जी कामंं उजव्या हातानंं करता ती ती सर्व कामंं आज डाव्या हातानंं करायची जी मुलंं डावखरी आहेत त्यांनी बरोबर या उलट करायचंं आहे.

आमचे दोन तीन विद्यार्थी रोज दिलेल्या व्रतावर चारोळी करून ग्रुपवर पाठवायचे.
त्यातील एक नमुना चारोळी -
आज केले डाव्या हाताने काम
दिला उजव्या हाताला आराम
साधे लिहिता आले नाही माझे नाम
पण निभावले व्रत गाळून घाम
डाव्या हाताने घरातला केअर काढायचा प्रयत्न केला. केर काढला पण गोळा करताना चांगलीच कसरत झाली.
माझा मावस भाऊ खूप छोटा आहे. तो जेवताना सगळे कपडे भरवतो. आज माझंंही जवळपास तेच झालंं. खाताना इतकं लक्ष ठेवून खावं लागत होतंं की बस्. जेवणासारखंं सोपंं कामही आज खूप अवघड होऊन बसलंं.
बऱ्याच वेळा सवयीनंं उजवा हात काम करायला पुढंं सरसावत होता. त्याला थोपवून धरणंं आणि आठवणीनंं डाव्या हातानंं काम करणं खरंच अवघड गेलं. पण मज्जा आली.
दादा मी डावखुरा आहे. आज माझी सर्व कामंं मी उजव्या हातानंं करायचा प्रयत्न केला. जेवलो पण पोट भरलंं असंं वाटलंंच नाही.
आज मी डाव्या हातानंं चित्रंं काढली ती एखाद्या लहान बाळानंं काढल्यासारखी आली.

व्रत ३
आज सकाळी आठ ते सायंकाळी सातपर्यंत घरातील टीव्ही बंद ठेवा. मोठ्यांना पण विनंती आहे की त्यांनी टीव्ही बघू नये. अगदीच अशक्य असल्यास मोठ्यांनी टीव्ही लावल्यास मुलांनो तुम्ही दुसऱ्या खोलीत जा. टीव्ही बंद म्हणून मोबाईलचा वापर अधिक असेही करू नये...

दादा आमच्याकडे टीव्ही जवळपास सात वर्षांपासून बंद आहे. घरातील संगणकही आज सकाळपासून बंद ठेवला आहे.
दादा आमच्याकडे टीव्ही आठ वर्षांपासून बंद आहे. पण मी कॉम्प्युटरवर पिक्चर बघत असते. पण आज नाही बघितला.
टीव्ही नाही म्हटल्यावर मी वर्तमानपत्राच्या अनेक वस्तू बनवल्या. पेन स्टँड, मोबाईल स्टँड, वॉल हँगिंग अशा.
मी आज अजिबात टीव्ही न बघता भरपूर चित्रंं काढली.
आज १० ते ३ या वेळेत टीव्ही बघितला नाही. मात्र नंतर घरात टीव्ही सुरु झाल्यामुळंं माझा संयम कमी पडला.
आज मी शेतातच काम करतोय आणि घरात येजा करताना टीव्हीकडे पाठ करतोय.
घरातील सगळ्यांनी या व्रताचंं आज पालन केलंं. छोट्या बहिणीनंंही टीव्ही लावायचा हट्ट केला नाही. बाबांनी पण बातम्या लावल्या नाहीत. आज घर खूप शांत वाटलं.

व्रत क्र. ४
आज सकाळी नऊ ते अकरा या वेळेत डोळे मिटून सर्व कामंं करायची आहेत. आणि केवळ एका जागी स्वस्थही बसून राहायचं नाही. या वेळेत जी जी कामंं तुम्ही रोज करत असता त्यातील जमतील ती कामंं सुरू ठेवायचा प्रयत्न करा. आवश्यक तिथंं घरच्यांची मदत घ्या.

एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना भिंतीला धडकणंं, कपडे वाळत टाकताना दोरी न सापडणंं अशा गमतीजमती सुरू आहेत.
आज फक्त दोन तास डोळे मिटून कामंं करायची होती. पण जे लोक सगळं आयुष्य असं जगतात त्यांना सलाम.
आज या व्रताबद्दल घरी कळलं तेव्हा आई म्हणाली, "आज तुला भरपूर टेंगुळ येणार."
मला माहीत होतंं की थोडावेळ तरी डोळे उघडण्याचा मोह होणार. म्हणून मग मी डोळ्याला पट्टी बांधून टाकली. दादा तर मला गांधारी माता म्हणूनच चिडवत होता.
घरातील वस्तूच मला सापडत नव्हत्या. मग मी एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूपर्यंत पावलंं मोजली. त्यामुळे वस्तू शोधणं सोपं झालं.
आज आईनंं अनेक वस्तू मला नुसत्या स्पर्शानंं ओळखण्यासाठी दिल्या. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे धान्य, पालेभाज्या, फळभाज्या व मसाल्याचे पदार्थ होते. मज्जा आली.
डोळे बंद केल्यावर अस्वस्थ वाटायला लागलंं. स्वतःचं घर असूनही चालताना अंदाज घ्यावा लागत होता.
माझ्या लहान भावाला वाटलं की मी रुसली आहे. म्हणून तो माझ्या डोळ्यांना सारखा हात लावत होता.
आईनंं दूध आणून हातात दिल्यावरही मी माहीत नाही का पण हातातून ग्लास खाली ठेवला. नंतर उचलायला गेलो तर सर्व दूध सोफ्यावर सांडलं.
आज मी देवाचे आभार मानले की देवानंं मला सगळे अवयव चांगले दिले आहेत.
....

व्रत ५
आज नेहमीप्रमाणंं सकाळचा नाश्ता, रात्रीचंं जेवण करायचंं. पण दुपारी मात्र जेवायचंं नाही. एक वेळचा उपवास करायचा.

अरे दादा आज माझा वाढदिवस. रात्रीच आईनंं सांगितलंं होतंं की उद्या दुपारच्या जेवणाला आमरस पोळीचा बेत आहे म्हणून. तर आज हे दुपारी न जेवण्याचंं व्रत. पण मी पााळणार आहे. रात्री खाईन.
वरचेवर पाणी पिणंं सुरू आहे. किमान पाच तांबे पाणी संपवलंं आहे आत्तापर्यंत.
आजच्या दिवसात काय शिकलो ते नक्की सांगता येणार नाही पण एखाद्या दिवशी काही नाही खाल्लं तर काही फार फरक पडत नाही हे नक्की समजलं.
नातू खात नाहीये. त्यामुळे आजीला घोर लागलाय.
व्रत संपल्यावर आईनंं मला सांगितलं तू जेवला नाही म्हणून मी पण दुपारी जेवले नाही.
आज आमच्या घरातील सर्वांनीच व्रताचंं पालन केलंं. दुपारी आम्ही सर्वजण ताक प्यायलो.
थोडे तरी खा, थोडे तरी खा म्हणून आजीनंं भंडावून सोडलं होतं. मला पण मग वाटलं दुपारी जेवू; आणि रात्री उपवास करू. पण आई म्हणाली नाही. तू व्रत घेतलंं आहे तर ते पूर्ण करायचं. आता आईकडूनच नकार आला. मग काय करणार.
मी आज पहिल्यांदाच इतका वेळ काही न खाता राहिले.
भुकेची जाणीव काय असते हे आज कळलं.

व्रत ६
आज स्वावलंबन पाळणे अपेक्षित आहे. दिवसभरात स्वतःची एकही गोष्ट दुसऱ्या कुणालाही करायला सांगायची नाही किंवा करवून घ्यायची नाही. त्यामुळे आज करून दे, हवे आहे, मदत करा हे शब्द हद्दपार करा. स्वतःचंं प्रत्येक काम स्वतः करा.

अग आई दोनदा शाळेच्या शिबिराला गेलो होतो ना तेव्हा आमचंं काम आम्हीच करायचो. त्यामुळे आजचंं व्रत सोपंं जाईल.
आज वेणी स्वतः घातली.
दिवसभरात जवळजवळ माझी दहा कामंं मीच केली. त्यामुळे आईचंं काम थोडंं हलकंं झालंं.
आई म्हणाली तू अधून-मधून काही मागण्यासाठी हाक मारतोय की काय असा मला भास होत होता. तिला काहीतरी चुकल्यासारखंं वाटलंं आज.

इंग्रजी संभाषण व्रतही जोरदार झालंं.
त्याविषयी स्वतंत्र लिहिलंं आहेच.
'दादा उद्याच्या व्रताची उत्सुकता आहे रे...'
रात्री मुले msg करू लागली.
मुलांनाच काय पालकांनाही, अगदी घरातील लहानग्यांनाही या व्रतांची मोठी
उत्सुकता वाटायला लागली होती.
आज आपल्या पुढ्यात काय मांडून ठेवलंं आहे याची सकाळी msg वाचल्यावरच त्यांना कल्पना यायची.
पहिली सात व्रते संपल्यावर पुढची व्रते मनात हळूहळू आकार घेऊ लागली होती...
विभाग प्रमुख,
पूर्व माध्यमिक विभाग,
ज्ञान प्रबोधिनी, निगडी.
मस्त दादा छान,👌👌👍💐
ReplyDelete