#संवादू व्हॉटस्अॅपचे रंगी...
संवादू व्हॉटस्अॅपचे रंगी... पूर्व माध्यमिक विभागाचा मी विभागप्रमुख आहे. एक विभागप्रमुख म्हणून आमच्या सर्वच्या सर्व - ३२५ पालकांशी संपर्क येतोच असे होत नाही. वर्गशिक्षकच बऱ्याच गोष्टी हाताळतात , निस्तरतात. मग मी whatsapp हे माध्यम निवडले. काही हितगुज करतो मी या माध्यमाद्वारे. एकतर्फी. निरपेक्ष भावानं.. म्हणजे किती जण वाचतात , त्यावर ते काय विचार करतात , काही सुचवले असेल तर तशी कृती करतात का ? यातलं मला काहीच समजत नाही. पण मी संवाद करत राहतो. प्रसंगोत्पात. दिवस ठरवून नाही. त्यातीलच काही मोजके संवाद हा आजच्या ब्लॉगचा विषय. गुरुकुलात काम करत असताना आ. भाऊ ( श्री. वा. ना. अभ्यंकर , केंद्रप्रमुख , ज्ञान प्रबोधिनी निगडी) नेहमी म्हणायचे , ' पालक व अध्यापक हे दोन स्वतंत्र गट असता कामा नये. हा मिळून एक गट असला पाहिजे. ' माझ्या विभागातील हे दोन्ही गट परस्परपूरक होण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न. ( प्रत्येक संवाद कोणत्या प्रसंगाबाबत झाला हे समजायला तुमच्यासाठी थोडी पार्श्वभूमीही दिली आहे.) .................