Posts

#जेव्हा वीरगती जिवंत होते...

Image
अभ्यास सहल क्र. १  जेव्हा वीरगती जिवंत होते... ...अनिल दुधानी सरांनी मुलांना एका वीरगळी पाशी नेलं  आणि  ते सांगू लागले... ‘’मुलांनो ही वीरगळ पहा. याच्या सर्वात खालच्या कप्प्यात  वीरगती  प्राप्त झालेला वीर दिसतोय. हा वीर पायदळातील होता. त्याने दोन  घोडेस्वारांशी पराक्रमाने झुंज दिली. शत्रू  घोडेस्वारांच्या  हातात भाले  होते. वीराच्या हातातही भा ला होता.  वीर पराक्रमाने  लढला. पण  त्याचा शत्रू सैन्यासमोर निभाव  लागला नाही. त्याची  झुंज अपयशी  ठरली. त्याला वीरगती  प्राप्त  झाली. पण या वीराची  अवस्था नाही  चिरा नाही पण ती अशी  झाली नाही. त्याच्या  अतुलनीय शौर्याची  गाथा  वीरगळी वर कोरली गेली. राज्यासाठी  लढण्याचं-मरण्याचं  पुण्य  त्याला मिळालं. त्याला न्यायला स्वर्गातून  चार अप्सरा  आल्या.  त्यांच्या हातात चौरी होती. चौरीने वीराला  हवा  घालत अप्सरा  त्याला घेऊन स्वर्गात गेल्या. वरच्या खणा...

#संवादू व्हॉटस्अॅपचे रंगी...

Image
संवादू व्हॉटस्अॅपचे रंगी... पूर्व माध्यमिक विभागाचा मी विभागप्रमुख आहे. एक विभागप्रमुख म्हणून आमच्या सर्वच्या सर्व - ३२५ पालकांशी   संपर्क येतोच असे होत नाही. वर्गशिक्षकच बऱ्याच गोष्टी हाताळतात , निस्तरतात. मग मी whatsapp हे माध्यम निवडले. काही हितगुज करतो मी या माध्यमाद्वारे. एकतर्फी. निरपेक्ष भावानं.. म्हणजे किती जण वाचतात , त्यावर ते काय विचार करतात , काही सुचवले असेल तर तशी कृती करतात का ?  यातलं मला काहीच समजत नाही. पण मी संवाद करत राहतो. प्रसंगोत्पात. दिवस ठरवून नाही. त्यातीलच काही मोजके संवाद हा आजच्या ब्लॉगचा विषय. गुरुकुलात काम करत असताना आ. भाऊ ( श्री. वा. ना. अभ्यंकर , केंद्रप्रमुख , ज्ञान प्रबोधिनी निगडी) नेहमी म्हणायचे ,  ' पालक व अध्यापक हे दोन स्वतंत्र गट असता कामा नये. हा मिळून एक गट असला पाहिजे. ' माझ्या विभागातील हे दोन्ही गट परस्परपूरक होण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न. ( प्रत्येक संवाद कोणत्या प्रसंगाबाबत झाला हे समजायला तुमच्यासाठी थोडी पार्श्वभूमीही दिली आहे.) .................