Posts

#राकट देशा कणखर देशा 'गडां'च्याही देशा...

Image
राकट देशा कणखर देशा 'गडां'च्याही देशा... (अभ्यास सहल क्र.२) ‘परत’ एकदा इतिहासाचा तास. परत शब्दाचा संदर्भ मागील विरगळींवरचा ब्लॉग. ‘मग आवडलं का कालचं डॉ. संग्राम इंदोरे यांचं व्याख्यान? किती घटक समजले एखाद्या किल्ल्याच्या निरीक्षणाचे?’ ‘दादा व्याख्यान छान झालं. मी २९ घटकांची यादी केलीये.’ ‘मी ३०.’ ‘दादा माझे ३२ घटक.’ ‘ठीकये ठीकये. चला आपण फळ्यावरच यादी करू. सांगा एकेक घटक.’ ‘घेरा, तटबंदी, बुरुज, महाद्वार, दिंडी दरवाजा.... मुले सांगू लागली. मी फळ्यावर हात चालवू लागलो. मोजून ३१ घटकांची यादी झाली. ‘बरं याशिवाय अजून कोणती माहिती आपल्याला असायला हवी? आपण मिळवायला हवी?’ ‘दादा किल्ल्याची उंची.’ ‘किल्यावर घडलेला इतिहास.’ ‘आजूबाजूचे किल्ले.’ ही सुद्धा यादी १०, ११ पर्यंत गेली. पुढच्या तासाला याबाबतचा आणखी एक लेख वाचून दाखवला. त्यात किल्ल्यावर जाण्यापूर्वी करायचा अभ्यास, प्रत्यक्ष किल्ला पाहताना केलेल्या नोंंदी, पडलेले प्रश्न आणि नंतर त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा केलेला प्रयत्न असे तीन टप्पे छान सांगितले होते. ‘चला पूर्वतयारी उत्तम झाल...

#शांतता...नाटक बसते आहे...

Image
शांतता...नाटक बसते आहे... ‘अरे किती वेळा सांगायचं रे? प्रेक्षक काय विंगेतून नाटक बघणार आहेत का? समोर बघा. पाठ करू नका...’ ‘अरे तुम्ही काय प्रेक्षकातून स्टेजवर येताय का? विंगेतून या.’ (कुठली विंग? इथे तर साधा पडदा पण नाहीये. – मुलांच्या मनातील प्रश्न.) ‘अरे त्या दोन फरशा आहेत ना ती तुमची विंग. त्यांच्यावरूनच जा ये करा. कुठेही सराव करताना प्रथम जागा ठरवून घ्यायच्या. लक्षात ठेवा...’ मानसीताईंचा तार स्वरातील आरडाओरडा सुरु होता. काही वेळा सांगून पुरत नाही. -     मग दोघी – मानसीताई व मयुरीताई तरातरा उठतात. (पात्रपरिचय - या दोघी अभिव्यक्ती विकसन योजनेतील नाट्य विषयाच्या प्रशिक्षिका. दोघीही मुळच्या तळेगावच्या. कलापिनी संस्थेतील डॉ. परांजपेंच्या कडक तालमीत घडलेल्या. अनेक व्यावसायिक नाटकांचा अनुभव गाठीशी. एकमेकांच्या घट्ट मैत्रिणी. आणि हो मयुरीताई या शाळेच्या पालकही आहेत बरं.) तो सीन प्रत्यक्ष करून दाखवायला लागतात. त्यातही एक पोरगं फटका खातचं. या दोघी सीन करून दाखवत असताना संबंधित मुलांनी तो भाग समोरून, प्रेक्षकातून पाहिला पाहिजे; असा यांचा आणखी एक नियम. ...

#या हृदयीचे त्या भिंतींवर...

Image
 या हृदयीचे त्या भिंतींवर ...  मागच्याच्या मागच्या मे महिन्यात शाळेचं रंगकाम निघालं.  प्रत्येक वर्ग वेगळ्या रंगाने रंगवण्याचं ठरलं.  या रंगकामात मुलांचाही काही सहभाग घेऊयात असं वाटून   गेलं.  त्यासाठी प्रत्येक वर्गातील मागची भिंत न रंगवता प्रायमर   देऊन   तशीच ठेवण्यात आली.   शाळा सुरु झाली आणि या पांढऱ्या रंगानंं विविध रूपंं धारण   करण्यास सुरवात केली.  हातांच्या ठशांपासून ते फुटबॉलच्या शिक्क्यापर्यंत आणि  स्वाक्षरीपासून ते शाईच्या डागापर्यंत सर्वांनी भिंत सजू लागली.  आता काहीतरी तातडीन करण्याची गरज निर्माण झाली होती.  जम्मत घराने योजलेल्या एका कार्यशाळेच्या माध्यमातून   आभाताईंंचा परिचय झाला होताच.  ..................................................   इ. ९ वी क चा वर्ग.  वेळ सकाळी ९ ची.  वर्गातील बाकांची रचना बदलेली.  सर्व बाकं फळ्याच्या बाजूने, दाटीदाटीने.  आज फळा म्हणून मागची भिंत.  वर्गात फक्त १५-१६ मुलंमुली, आभाताई व...