Posts

Image
  सफर अध्यापकांच्या अनुभव विश्वाची!      शिक्षण पद्धतीतील एक महत्त्वाचं सूत्र म्हणजे अध्यापक विद्यार्थी जिव्हाळ्याचं नातं हवं. अर्थात यासाठी हवा प्रत्यक्ष संपर्क , संवाद अन् सहवास! पण मग या करोनाच्या काळात काही करता येईल का ? अध्यापकांच्या गप्पांतून त्यांचा जीवनप्रवास मुलांना समजला तर ? वा! वा!! मजा येईल की!!! स्वतःवरच खूष. खरं तर प्रत्येकच व्यक्तीनं त्याच्यात्याच्या आयुष्यात काही न काही मिळवलेलं असतं. अडचणींवर मात केलेली असते. छोट्यामोठ्या आव्हानांना तो सामोरा गेलेला असतो. त्याच्यात्याच्या परीनं लढलेला असतो. पण आपला हा सगळा प्रवास उलगडून दाखवण्याची वेळ किंवा संधी प्रत्येकालाच मिळते असं नाही. सध्याच्या काळात ही संधी जाणीवपूर्वक निर्माण केली तर... यातूनच जन्म झाला या गप्पासत्रांचा. नाव होतं -   सफर अध्यापकांच्या अनुभवविश्वाची!!! पहिली मुलाखत ठरली ती नाट्य प्रशिक्षिका मानसीताईंची.   " अहो मानसीताई या शनिवारी आपल्या विभागातील सर्व मुलांसमोर   तुमची   मुलाखत ठेवू. काय म्हणता ?" " काहीही काय ? हे काय मध्येच ?? नको ओ..." " मुद्दे काढून ...

#लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास - भाग ६

Image
नभ झाकोळूनी गेले... 'दादा सध्या नजर कुठे लावून आहात?' हल्ली हा प्रश्न सतत विचारला जातोय. आणि प्रत्येक वेळी वेगळं उत्तर द्यायला मलाही जमलंय. यावेळचं उत्तर होतं...  त्याचं असं झालं... प्रशांत दिवेकर सरांशी फोन सुरू होता.  ई-प्रशिक्षकसाठी मी लिहित असलेल्या लेखासंदर्भात.  ढीग सूचना करत होते सर माझ्या लेखावर. एकदाच्या त्या झाल्यावर सरांना म्हटलं, "प्रशांत सर माझ्या डोक्यातील परिसर निरीक्षणाचे घटक संपले बुवा. सुचवा की काही."  "ढगांचे निरीक्षण करता येईल बघ," लगेच उत्तर. जणू माझ्या या प्रश्नाची ते वाटच पाहत होते; इतकं लगेच.  "सध्याचा काळही यासाठी उपयुक्त आहे आणि."  विषय आवडला होता आपल्याला.  व्यक्तीशोध मनातून सुरु होण्याआधीच; "सुरेंद्रला वेळ काढायला सांग." नावही पुढयात (कानात) येऊन पडलं होतं. एका हातानं प्रशांतसरांचा फोन ठेवला आणि दुसऱ्या हातानं सुरेंद्रदादांना फोन लावला.  "हो. चालेल की." सुरेंद्रदादाचं बोलणं मोजकं व नेमकं. दोन दिवसात तारीखही निश्चित झाली. मुले मराठी माध्यमातील आहेत हे समजल्यावर सुरेंद्रदादानं सर्व ppt आवर्जून मराठीतून ...

#लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास - भाग ५

Image
नित्य नवा दिवस परिसर निरीक्षणाचा...   मुलांच्याच नाही तर अध्यापक, पालक यांच्याही नजरा परिसराकडे वळवण्यात आम्ही काही प्रमाणात यश मिळवलं होतं ; त्याचीच ही काही नमुना उदाहरणं. सुरुवात अर्थातच स्वत:पासून ... लेकीच्या १० वीच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून;  भाड्यानं दिलेली खोली वापरायला घेतली. सध्या मोकळीच आहे ना ती. म्हंटलं तिच्या वाटेला तरी कशाला एकाकीपणा. या खोलीचा एक फायदा म्हणजे खिडकी उघडली की;  खालचं आमचं अंगण आणि समोरचं मैदान, मैदानातील गणपतीचं मंदिर असं सगळं दिसतं.  खिडकीतून डोकावणं हा एक विरंगुळा झाला मग माझा. एक दिवस तास सुरु असताना समोर लगबग दिसली. सूर्यपक्ष्यानं चक्क घरटं बांधायला घेतलं होतं की;  अंगणातील बेलाच्या झाडावर. घरट्याचा आकार बघता ४\५ दिवस झाले असावेत. मग त्या खोलीत गेल्यावर नजर बाहेरच स्थिरावू लागली. खूप म्हणजे खूपच गोष्टी लक्षात आल्या;  घरटे बांधकामातील. ९\९.३० ते ५\५.३० असे वर्किंग अवर्स दिसले. एकदम ऑफिस टाईम की. नुसत्या चकरा. एका वेळी त्या इलुश्या चोचीत येणार तरी किती म्हणा. साधा हिशोब करा. तासाला किमान २०\२५ फेऱ्या. असे आठ तास. असे मी ...