Posts

Image
  शांततेच्या काळातील मणिपूर दर्शन एप्रिल २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड मधील मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या दोन कार्यकर्त्यांनी - श्री. मनोज देवळेकर (कार्यवाह)   श्री.   शिवराज पिंपुडे ( कोषाध्यक्ष)   यांनी संस्थेच्या कामानिमित्त मणिपूरचा सहा दिवसांचा दौरा केला. मणिपूर मधील पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या (PSVP) विलक्षण कार्याची उभारणी कशी झाली हे तर या लेखातून समजेलच पण मणिपूरी समाजजीवनाची अनेक छोटीछोटी वैशिष्ट्येही उलगडली जातील... भय्याजी काणे     सकाळी सात वाजता आमचा इंफाळपासून खारासोमसाठीचा प्रवास सुरू झाला. रामकृष्ण मिशनचे कार्यकर्ते सिद्धार्थजी यांच्यासोबत ; त्यांच्याच गाडीतून. पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानची पहिली शाळा उखरूल जिल्ह्यातील खारासोममध्ये सुरु झाली होती. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांना भेटण्यास आम्ही खूपच उत्सुक होतो. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते नरेंद्रजी केणी हेही सोबत होते. जागोजागी उखडलेला रस्ता त्यात भर म्हणून ठीकठिकाणी सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे असलेली बाह्य वळणे आणि डोंगराळ भाग त्यामुळे सुमारे १६५ कि. मी. अंतरासाठी सहा तासांचा प्...
Image
  सात्विक कर्ता वा. ना. अभ्यंकर तथा भाऊ जन्म – १ मे १९४१, मृत्यू – १६ फेब्रुवारी २०२१ भाऊ मूळचे कोकणातले , देवगड तालुक्यातल्या नारिंग्रे या गावचे. वडिलांच्या करारी , निश्चयी वृत्तीचा भाऊंच्या मनावर खोल ठसा उमटला होता. अकरावी पर्यंतचे शिक्षण देवगडला झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी भाऊ पुण्यात आले. सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून B . A . चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.   ' तुमची नियुक्ती झाली आहे. ताबडतोब निघा. ' अशी नियुक्तीची तार देवगड हायस्कूलमधून भाऊंना प्राप्त झाली. पुन्हा एकदा जन्मगावच्या जवळ जाण्याची संधी भाऊंना मिळाली. त्या शाळेत त्यांनी अकरावीचे संस्कृत आणि गणित हे विषय शिकवले. पांढरे शुभ्र धोतर , पांढरा सदरा आणि त्यावर पांढरी टोपी असा भाऊंचा पेहराव असायचा . या त्यांच्या पेहरावात त्यांच्या तोंडून अस्खलित संस्कृत आणि इंग्रजी ऐकताना अनेकांना मोठे अप्रूप वाटे. दोन वर्षांनी बी.एड.च्या शिक्षणासाठी भाऊ पुन्हा पुण्यात आले. बी. एड. करत असतानाच ' नूमवि ' त शिकवायला त्यांनी सुरुवात केली. याच काळात भाऊंचा विवाह रत्नागिरीतील सुधा करमरकर यांच्याशी झाला. सुधाताईंचे ...