जय श्रीराम Majuli दर्शन ७ मे चा दिवस. सकाळी साडेदहाची वेळ. सामानसुमान घेऊन हॉटेल सोडलं आणि हायवेवर येऊन थांबलो. दहा मिनिटात एक गाडी येताना दिसली. हात दाखवताच गाडी थांबली. “जोराहट ? ” इतकाच प्रश्नार्थक शब्द उच्चारला. “आ जाओ|” आतून प्रतिसाद आला. एसी गाडी होती. बसायला जागा होती. और क्या चाहिये भाई! काझीरंगा ते जोराहट हे अंतर होतं सुमारे शंभर किलोमीटर. दोन तासांचा प्रवास होता. साधारण साडेबाराच्या सुमारास एके ठिकाणी ड्रायव्हरनं उतरायला सांगितलं मला. तिथून निमाटी घाट सुमारे दहा किलोमीटरवर होता. टमटम करून अर्ध्या तासात पोहोचलो. फेरीबोट सुटायलाच आली होती. पळत जाऊन तिकीट काढलं. घाईघाईत फेरीमध्ये चढलो. चारचाकी , दुचाकी वाहने फेरीवर आधीच चढवण्यात आली होती. मी पण गाड्यांच्या इथेच जाऊन थांबलो. ”अंदर जाओ|” एकानं सुचवलं. ‘अंदर’ म्हणजे कुठे मला समजेना. बोटीच्या तळाकडे जाणारा एक छोटा दरवाजा दिसला. चार-पाच पायऱ्या उतरून त्या दरवाज्यातून आत गेलो. तर ५०-६० माणसं बाकड्यावर बसलेली दिसली. आत्ता रचना लक्षात आली. बोटीचे दोन टप्पे होते. एक वरचा टप्पा एक खालचा. खालचा भाग झोपडी सारखा बांधला होता. या ख...
Posts
Showing posts from July, 2026