Posts

Showing posts from September, 2026

माजुली दर्शन...!

 माजुली दर्शन...! ७ मे चा दिवस होता. सकाळी साडेदहाची वेळ. सामानसुमान घेऊन काझीरंगा मधील हॉटेल सोडलं आणि हायवेवर   येऊन   थांबलो. दहा मिनिटात एक गाडी येताना दिसली. हात दाखवताच गाडी थांबली. “जोराहट ? ”   इतकाच प्रश्नार्थक शब्द उच्चारला. “आ जाओ |” आतून प्रतिसाद आला. एसी गाडी होती आणि बसायला जागा मिळाली. धन्यच वाटले अगदी. काझीरंगा ते जोराहट हे अंतर होतं सुमारे शंभर किलोमीटर. दोन तासांचा प्रवास होता. साधारण साडेबाराच्या सुमारास जोरहाट लागल्यावर एके ठिकाणी ड्रायव्हरनं उतरायला सांगितलं मला. ज्या चौकात मला ड्रायव्हरनं उतरवलं तिथून निमाटी घाट सुमारे दहा किलोमीटरवर होता. टमटम करून अर्ध्या तासात पोहोचलो. फेरीबोट सुटायलाच आली होती. पळत जाऊन तिकीट काढलं. घाईघाईतच ’ बोटीमध्ये चढलो. चारचाकी ,  दुचाकी वाहने बोटीवर आधीच चढवण्यात आली होती. मी गाड्यांच्या इथेच जाऊन थांबलो. ”अंदर जाओ |” मझ्या जवळ उभ्या असणाऱ्या एकानं सुचवलं. पण ‘अंदर’ म्हणजे कुठे मला समजलं नाही. मग बोटीच्या तळाकडे जाणारा एक छोटा दरवाजा दिसला.   चार-पाच   पायऱ्या उतरून त्या दरवाज्यातून आत गेलो. तर   ...