#करोनाच्या नजरकैदैत... भाग ८
करोनाच्या नजरकैदैत... भाग ८ कॉन्फरन्स कॉल सुरु होता. "कंटाळा आला आहे ओ घरकामाचा", इति मयुरीताई. "हो ना. आता मुलांसारखंं आम्हालाही होत आहे; काहीतरी कृती द्या, नवीन सांगा काहीतरी करायला", इति मानसीताई. सगळ्यांचंं एक खळखळून हास्य. "बरं ऐका ना." या दोन शब्दांंनंतर एकदमच शांतता. काहीतरी वाढून ठेवलंं आहे आपल्या पुढ्यात याची जाणीव दोघींनाही तत्काळ झाली. "तुमच्या दोघींच्या प्रत्येकी अकरा अकरा कथा सांगून झाल्या आहेत. तर असं वाटतंय की हा कथावाचन उपक्रम थांबवूया." (हे अनपेक्षित होतं दोघींंनाही.) "हो हो. अगदी आनंदानंं. आमच्याही मनात येतच होत हे. पण मांजराच्या गळ्यात...." "हं हं कळलं कळलं. बरं ऐका ना." परत एकदा तीच शांतता. "समजा मुलांना कथा वाचून त्या पोस्ट करायला सांगितल्या तर चालेल का?" "हो चालेल की. काहीच हरकत नाही." "तसंं नाही हो. आधी उपक्रम जाहीर करू. मग इच्छुक मुलांची नोंदणी करू. त्यांचे दोन गट करू. त्यातला एकेक गट तुमच्याकडे येईल. त्या गटातील मुलांनी क्रमश: आधी तुम्ह...